Marathi

पायांचे सौंदर्य वाढवणाऱ्या हलक्या वजनाच्या पैंजण डिझाईन्स

सध्याच्या तरुणींमध्ये लाईटवेट आणि ट्रेंडी सोन्याच्या पैंजणांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.
Marathi

गोल्ड बीड्स पैंजण

साध्या साखळीत मधेमधे छोटे सोन्याचे मणी असलेली ही डिझाईन अत्यंत क्लासिक दिसते. कॅज्युअल ड्रेस आणि रोजच्या वापरासाठी ही डिझाईन अगदी सोयीस्कर आहे.

Image credits: kitchu collections
Marathi

रॉयल लुक पैंजण

मधेमधे चमकदार खड्यांचे काम असलेले हे अँकलेट्स पायांना रॉयल लुक देतात. पारंपरिक पोशाखांवर ही डिझाईन एक वेगळीच चमक आणते.

Image credits: kitchu collections
Marathi

स्टायलिश आणि नाजूक लुक

अत्यंत बारीक साखळी मॉडेलमधील हे सोपे पैंजण खूप नाजूक दिसते. वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न आऊटफिटवर ही डिझाईन आधुनिक टच देते.

Image credits: kitchu collections
Marathi

ग्रँड डबल चेन डिझाईन

छोटे हार्ट शेप्स आणि लहान घुंगरू असलेले हे डबल चेन पैंजण खूप आकर्षक दिसते. सणांसुदीला ग्रँड लुक हवा असल्यास हा उत्तम पर्याय आहे.

Image credits: kitchu collections
Marathi

फुलांची डिझाईन

लहान फुलांची रचना आणि मोत्यांचे लटकन असलेले हे पैंजण पारंपरिक लुक देते. सण आणि लग्नसमारंभात पैठणी किंवा सिल्क साडीवर हे खूप छान दिसते.

Image credits: kitchu collections
Marathi

डेलीवेअर मिनिमलिस्ट डिझाईन

कोणतेही घुंगरू किंवा लटकन नसलेले हे केवळ गोल्ड चेन डिझाईनमधील पैंजण मिनिमलिस्ट लुक देते. ऑफिसवेअर आणि रोजच्या वापरासाठी हे अगदी एलिगंट आहे.

Image credits: kitchu collections
Marathi

पानांच्या आकाराचे पैंजण

पानांच्या आकारात विणलेली ही गोल्ड पैंजण डिझाईन खूप युनिक आहे. पारंपरिक कपड्यांवर ही डिझाईन एक वेगळा आणि व्हिंटेज लुक देते.

Image credits: kitchu collections
Marathi

ब्रायडल लुक अँटीक पैंजण

कुंदन आणि लहान घुंगरू यांच्या संगमातून बनवलेले हे अँटीक पैंजण पायांचे सौंदर्य अधिक वाढवते. लग्नकार्य आणि सणांच्या प्रसंगी हे फार खास दिसते.

Image credits: kitchu collections
Marathi

मोत्यांचे पैंजण

रांगेत सजवलेल्या मोत्यांच्या लटकनमुळे हे पैंजण शाही आणि पारंपरिक फील देते. नववधूचा पोशाख किंवा साडीवर ही डिझाईन परिपूर्ण बसते.

Image credits: kitchu collections

Curd Benefits : दररोज दही खाण्याचे हे 6 जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Lungs Health : फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 6 पदार्थ

Bangle Designs : हातांचे सौंदर्य वाढवतील या डेलीवेअर स्लीक बांगड्या

Belly Fat : रोज हे ड्रिंक्स प्या अन् पोटावरची चरबी झटपट घालवा