सार

तुम्ही पाठवलेल्या रोझ डे च्या खास शुभेच्छा वाचून तुमच्या खास व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात अजूनच सुंदर होईल. तुम्हाला जर तुमच्या भावना व्यक्त करायला शब्द सापडत नसतील तर खालील खास शुभेच्छांपैकी एखादा मेसेज निवडा व आपल्या प्रेमाच्या माणसाला पाठवा.

Rose Day 2024: फेब्रुवारी महिना हा जोडप्यांसाठी खूप खास असतो. कारण या महिन्यात समस्त प्रेमीजनांचा खास दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे (Valentine's Day) साजरा केला जातो. व्हॅलेंटाइन वीकचा (Valentine Week) प्रत्येक दिवस जोडप्यांसाठी खूप खास असला तरी त्याची सुरुवात रोझ डे (Rose Day) पासून होते. या दिवशी कपल्स एकमेकांना गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

जर तुमच्याही मनात एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम उत्पन्न झाले असेल आणि तुमच्या भावना शब्दात व्यक्त कशा कराव्या या विवंचनेत तुम्ही असाल तर त्यासाठी रोझ डे (Rose Day Message for Husband) हा उत्तम दिवस आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या सर्व भावना गुलाबाच्या द्वारे व्यक्त करू शकता.

त्या लाल गुलाबाबरोबरच तुम्हाला रोझ डेच्या निमित्ताने तुमच्या जोडीदाराला किंवा होऊ घातलेल्या पार्टनरला रोमँटिक मेसेज (Rose Day Quotes For Wife)  पाठवायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही रोझ डे (Rose Day 2024) मेसेजेस घेऊन आलो आहोत, जे तुमच्या जोडीदारावर तुमचे प्रेम व्यक्त करण्यात तुमची मदत करतील.

रोझ डे मेसेज फॉर पार्टनर (Rose Day Messages for Partner) 

सुंदर शब्दांद्वारे आपल्या भावना व्यक्त करणे हे गुलाबांचा पुष्पगुच्छ देण्याइतकेच रोमँटिक असते. तुम्ही पाठवलेल्या रोझ डे च्या खास शुभेच्छा वाचून तुमच्या खास व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात अजूनच सुंदर होईल. तुम्हाला जर तुमच्या भावना व्यक्त करायला शब्द सापडत नसतील तर खालील खास शुभेच्छांपैकी एखादा मेसेज निवडा व आपल्या प्रेमाच्या माणसाला पाठवा.

१. जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल बघतो, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर तुझाच चेहेरा येतो. माझ्या गुलाबाच्या फुला, “Happy Rose Day” तुला!

२. तुझ्या गालांवर उमलू देत गुलाब व ओठांवर हास्याची फुले..तुझा गोड चेहेरा व सुंदर मन बघून मी माझे हृदय तुला दिले. Happy Rose Day!

३. गुलाबाचे फुल सुकले तरी त्याच्या पाकळ्या सुगंध देत राहतात. तसेच आपले प्रेम कितीही जुने झाले तरी ते कायम आपल्या आयुष्यात सुगंध निर्माण करेल. Happy Rose Day!

४. प्रेमाच्या भांडणात कोण जिंकतंय कोण हरतंय याला महत्व नाही तर आयुष्यभर साथ देईल असं नातं कायम जिंकलं पाहिजे. तू साथ दिलीस तर आपलं सुंदर नातं असंच सगळ्या परीक्षांचे अडथळे पार करून जिंकेल. Happy Rose Day!

५. जसा रोझ डे गुलाबाशिवाय अपूर्ण आहे, तसेच माझे आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. माझ्या आयुष्य सुगंधित करणाऱ्या माझ्या गुलाबाच्या फुला, तुला Rose Day च्या शुभेच्छा!

६. प्रेमात आणि मैत्रीत एकच छोटासा फरक आहे. मैत्री जर गुलाबाचे फुल असेल तर प्रेम हा त्या गुलाबाचा सुगंध आहे. आणि तुझ्या रूपाने मला मैत्री व प्रेम या दोन्हींचा सुरेल संगम असलेला सुगंधी गुलाब मिळाला आहे. Happy Rose Day!

आणखी वाचा -

Valentine Day पर्यंत कंबर होईल बारीक, या 4 मसाल्यांचा करा वापर

Valentine Day Week List 2024 : फेब्रुवारी महिन्यात या दिवसापासून सुरू होणार 'व्हॅलेंनटाइन वीक', पाहा 'रोझ डे ते किस डे' पर्यंतचे कॅलेण्डर

Winter Special Hair Oil : लांबसडक, घनदाट व काळेभोर केस हवे आहेत? वापरा हे नैसर्गिक तेल VIDEO