Valentine Day पर्यंत कंबर होईल बारीक, या 4 मसाल्यांचा करा वापर
लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला जीरे, ओवा, बडीशेप आणि हिंगाचा वापर करायचा आहे. या गोष्टींचा वापर करून तुमचा लठ्ठपणा कमी होऊ शकतो.
जीरे, हिंग, ओवा आणि बडीशेपमध्ये औषधी गुणधर्म असतात. यामध्ये फायबरसह कॅल्शिअम, पोटॅशिअम, खनिज, झिंक आणि लोहसारखी पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
जीरे, बडीशेप, हिंग आणि ओवा भाजून मिक्सरमध्ये त्याची पूड तयार करा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तयार केलेल्या पूडचे दररोज सेवन करा.
व्हॅलेंटाईन डे आधी लठ्ठपणा कमी करण्यासाठी जीरे, हिंग, ओवा आणि बेडीशेपच्या मिश्रणाचे सेवन सकाळ-संध्याकाळ करू शकता. एक चमचा मिश्रण गरम पाण्यात मिक्स करून दररोज प्या.
जीरे, हिंग, बडीशेप आणि ओव्यामध्ये पोषण तत्त्वांसह अँटी-ऑक्सिडेंट्स, अँटी-माइक्रोबिअल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
जीरे, हिंग, ओवा आणि बडीशेपच्या मिश्रणामुळे पचन क्रिया सुधारण्यासह बॉडी डिटॉक्स देखील होते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.