सार
Saphala Ekadashi 2024 : हिंदू धर्मात एकादशीच्या तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. अशाप्रकारे वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. या सर्व एकादशींची नावे आणि महत्त्व वेगवेगळे आहे.
Saphala Ekadashi Importance : हिंदू पंचांगामध्ये दहाव्या महिन्याला 'पौष महिना' म्हटले जाते. या महिन्यात काही प्रमुख सण-उपवास येतात. यापैकीच एक म्हणजे सफला एकादशी. या एकादशीचा उपवास पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीवेळी केला जातो.
सफला एकादशीचे महत्त्व काही ग्रंथांमध्ये दिले आहे. अशी मान्यता आहे की, सफला एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. याशिवाय घरात सुख-समृद्धी येते. जाणून घेऊया सफला एकादशीचे महत्त्व, पूजा-विधी आणि शुभ मुहूर्ताबद्दल अधिक....
कधी आहे सफला एकादशी?
पंचांगानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 6 जानेवारी, शनिवार रात्री 12 वाजून 2 मिनिटांनी सुरू होऊन 7 जानेवारी, रविवार रात्री 12 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे.
सफला एकादशीचा संपूर्ण दिवस शुभ असणार आहे. यामुळे या दिवशी केलेले व्रत अत्यंत खास असणार आहे. पण 8 जानेवारी, सोमवारी उपवास सोडला जाईल.
शुभ मुहूर्त
- सकाळी 8 वाजून 33 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 53 मिनिटांपर्यंत
- सकाळी 9 वाजून 53 मिनिटांपासून ते रात्री 11 वाजून 13 मिनिटांपर्यंत
- दुपारी 1 वाजून 52 मिनिटांपासून ते 3 वाजून 12 मिनिटांपर्यंत
- संध्याकाळी 5 वाजून 51 मिनिटांपासून ते 7 वाजून 32 मिनिटांपर्यंत
सफला एकादशीचे व्रत करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा
- 7 जानेवारीला सकाळी स्नान करून पूजा करण्यास सुरूवात करा. दिवसभर व्रतामधील नियमांचे पालन करा.
- सफला एकादशीच्या कोणत्याही शुभ मुहूर्तावेळी भगवान विष्णू यांचा फोटो किंवा चित्राची पूजा करा. पूजेवेळी तूपाचा दिवा लावा.
- पूजा करताना ऊं नम: भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप करा. यानंतर विष्णूंना प्रसाद दाखवताना त्यावर तुळशीचे पान ठेवा.
- पूजेनंतर आरती करा आणि प्रसाद घरातील मंडळींना द्या
- 8 जानेवारीला ब्राम्हणांना भोजन दिल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.
- अशाप्रकारे सफला एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहाते.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
Year 2024वर असणार शनिचा प्रभाव, जाणून घ्या अंकशास्रातील 24 क्रमांकाचे महत्त्व
महिलांनी या 5 ठिकाणी केस मोकळे सोडून फिरणे टाळा, अन्यथा...
वास्तुशास्रानुसार घरातील देव्हाऱ्याजवळ या वस्तू ठेवणे मानले जाते अशुभ