हिंदू धर्मात महिलांनी केस मोकळे सोडून फिरणे अयोग्य मानले आहे. अशी मान्यता आहे की, केस मोकळे सोडल्याने नकारात्मक ऊर्जेचा तुमच्यावर प्रभाव पडू शकतो.
Image credits: adobe stock
Marathi
केस मोकळे सोडून फिरणे टाळा
काही खास ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो. अशा ठिकाणी महिलांनी केस मोकळे सोडणे अशुभ मानले जाते. याबद्दलच जाणून घेऊया...
Image credits: adobe stock
Marathi
विहीर
विहीरीजवळ नकारात्मक ऊर्जा असते असे मानले जाते. यामुळे महिलांनी कधीच सकाळी अथवा रात्रीच्या वेळेस चुकूनही विहीरीजवळ केस मोकळे सोडू नये.
Image credits: adobe stock
Marathi
घनदाट झाड
एखाद्या मोठ्या व घटदाट झाडाजवळ महिलांनी केस मोकळे सोडू नये. कारण अशा झाडांजवळ नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात सक्रिय असतात.
Image credits: adobe stock
Marathi
नदी
रात्रीच्या वेळेस नदीच्या आसपास जाणे टाळावे असे सांगितले जाते. याशिवाय नदीजवळ कधीच केस मोकळे सोडू नये. कारण या ठिकाणीही नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असतात.
Image credits: adobe stock
Marathi
स्मशानभूमी
स्मशानभूमी किंवा त्याच्या आजूबाजूला महिलांनी कधीच केस मोकळे सोडू नये. या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा अधिक असतात.
Image credits: adobe stock
Marathi
काळोखाच्या ठिकाणी
बहुतांशवेळा रात्रीचा प्रवास करताना आपल्यासमोर लख्ख काळोख आणि अज्ञात रस्ते असतात. पण काळोखाच्या ठिकाणी महिलांनी कधीच केस मोकळे सोडू नये असे सांगितले जाते.
Image credits: adobe stock
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.