वास्तुशास्रानुसार घरातील देव्हाऱ्याजवळ या वस्तू ठेवणे मानले जाते अशुभ

| Published : Jan 03 2024, 03:16 PM IST / Updated: Jan 03 2024, 03:18 PM IST

rules for home temple

सार

घरात आपण दररोज देवाची पूजा करतो. पण तुम्हाला माहितेय का, वास्तुशास्रानुसार देव्हाऱ्याजवळ किंवा देव्हाऱ्यात काही गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या देव्हाऱ्याजवळ ठेवू नयेत याबद्दल जाणून घेऊया अधिक....

Vastu Tips : हिंदू धर्मात पूजेला फार महत्त्व आहे. कोणताही सण असो किंवा शुभ कार्य करण्याआधी घरातील देवाची पूजा केली जाते. दररोज पूजा केल्याने घरातील नकारात्मक उर्जा दूर होऊन सकारात्मक उर्जा वाढली जाते. पण पूजा करण्यासंदर्भात किंवा देवाचा देव्हारा कसा असावा याबद्दलचे काही नियम वास्तुशास्रात दिले आहेत.

वास्तुशास्रानुसार, घरातील देव्हाऱ्याजवळ काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. याचा तुमच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया वास्तुशास्रानुसार देव्हाऱ्याजवळ अशा कोणत्या वस्तू ठेवू नये याबद्दल अधिक....

पितरांचे फोटो
घरातील देव्हाऱ्याजवळ पितरांचे फोटो अजिबात लावू नये. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही देव्हाऱ्याजवळ पितरांचे फोटो लावले असल्यास ते काढा. पितरांचे फोटो नेहमीच दक्षिण दिशेला लावावेत.

फाटलेली धार्मिक पुस्तके
देव्हाऱ्याजवळ कोणतीही फाटलेली धार्मिक पुस्तके ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक उर्जा वाढू शकते. याशिवाय देव्हाऱ्यातील सुकलेली फुलही काढून टाका.

शंख
देव्हाऱ्यात एकापेक्षा अधिक शंख कधीच ठेवू नये असे वास्तुशास्रात सांगितले आहे. वास्तुशास्रानुसार, देव्हाऱ्यात एकापेक्षा अधिक शंख ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. याशिवाय शनि देवाची मूर्ती देखील देव्हाऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते.

भग्न झालेली मूर्ती किंवा रौद्र रूपातील देवाचा फोटो
वास्तुशास्रानुसार, घराच्या सुख-शांतीसाठी घरातील देव्हाऱ्यात देवाचे रौद्र रूपातील फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. याशिवाय देवाची भग्न झालेली मूर्तीही देव्हाऱ्यात ठेवू नये. अशा मूर्तींचे विसर्जन करावे.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा: 

तुमच्या मोबाइल क्रमांकामध्ये आहेत हे 2 अंक? खर्च होतील अधिक पैसे

अयोध्येतील राम मंदिराशिवाय ही ठिकाणे आहेत प्रसिद्ध, नक्की भेट द्या

Shani Sadesati 2024 : नववर्षात या 3 राशींसाठी सुरू होणार शनिची साडेसाती