या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा
नागरिकांना *401# क्रमांक डायल करून एखाद्या अज्ञात क्रमाकांवर फोन करण्यास सांगितले जाते. यामुळे दूरसंचार विभागाने मोबाइल युजर्सला सतर्क राहण्यास सांगितले आहे.
या प्रकारच्या फोन कॉलमुळे फसवणूक करणाऱ्यांना युजर्सचे इनकमिंग कॉल उचलण्याची परवानगी मिळते. याचा गैरफायदा घेत तुमची फसवणूक केली जाऊ शकते.
युजरने *401# क्रमांक डायल केल्यानंतर अज्ञात व्यक्तीला फोन केल्यास, युजरच्या मोबाइलवर येणारे फोन अज्ञात व्यक्तीच्या फोनवर फॉरवर्ड होऊ लागतात.
दूरसंचार विभागाने म्हटलेय की, *401# क्रमांकामुळे युजरच्या मोबाइलवर येणारे फोन अज्ञात व्यक्तीच्या मोबाइलवर कोणत्याही अडथळ्याशिवाय फॉरवर्ड होतात. अशाप्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते.
फसवणूक करणारा व्यक्ती युजरला दूरसंचार सेवेतील कर्मचारी किंवा तांत्रिक मदत करणारा कर्मचारी असल्याचे सांगत नागरिकांसोबत बातचीत करतो.
युजरला सिम कार्डमध्ये समस्या किंवा नेटवर्कसंबंधित समस्येबद्दल सांगत *401# क्रमांकावर फोन करण्यास सांगितले जाते. यानंतर एक फोन क्रमांक स्क्रिनवर येतो.
स्क्रिनवरील फोन कॉलमुळे युजरच्या मोबाइलवरील फोन कॉल कोणत्याही अटीशिवाय फॉरवर्ड होण्यास सुरुवात होते. दूरसंचार विभागाने म्हटले की, कंपनी कधीच युजर्सला *401# डायल करण्यास सांगत नाही.
दूरसंचार विभागाने नागरिकांना सल्ला दिलाय की, कॉल फॉरवर्डिंगसाठी फोनमधील सेटिंग्स तपासून पाहा. याशिवाय *401# च्या माध्यमातून कॉल फॉरवर्डिंगचा पर्याय सुरू असल्यास तो लगेच बंद करा.