सार
रंगपंचमीच्या सणावेळी रंगांची मुक्तपणे उधळण करत आयुष्यात नवे रंग भरले जातात. या दिवशी मित्रपरिवारासोबत धम्माल-मस्ती केली जाते. यंदाच्या रंगपंचमीला सकाळी नाश्तासाठी हटके रेसिपी तयार करायची असल्यास कलरफुल इडलीचा पर्याय बेस्ट आहे.
Colorful Idli Recipe : यंदा रंगपंचमी येत्या 25 मार्चला साजरी केली जाणार आहे. रंगपंचमीनिमित्त बच्चेकंपनीसाठी किंवा घरी येणाऱ्या पाहुण्यासाठी खास पदार्थ हमखास तयार केले जातात. यंदाच्या रंगपंचमीनिमित्त तुम्ही कलरफुल इडलीची रेसिपी तयार करू शकता. जाणून घेऊया कलरफुल इडली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर...
साहित्य
- अर्धा किलो इडली पीठ
- बीट
- पालक
- बीट
- हळद
- कोको पावडर
कृती
- सर्वप्रथम पालक, बीट, हळद आणि कोको पावडर यांची वेगवेगळी घट्ट पेस्ट तयार करून घ्या.
- चार वेगवेगळ्या बाऊमध्ये इ़डलीचे पीठ घेऊन त्यात पालकची पेस्ट मिक्स करा. अशाच पद्धतीने बीटाची पेस्ट, हळदीच्या पावडरची पेस्ट आणि कोको पावडर इडली पीठात मिक्स करा.
- इडलीचे भांडे घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम इडलीचे पीठ टाका. त्याच्याबाजूने पालक, बीट, कोको पावडर आणि हळद मिक्स केलेले इडलीचे पीठ सोडा.
- इडलीच्या भांड्यात गरम पाणी करुन त्यात इडली 10-15 मिनिटे व्यवस्थितीत शिजण्यास ठेवा.
- कलरफुल इडली पूर्णपणे शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
VIDEO : रंगपंचमीनिमित्त तयार करा कलरफुल इडली, पाहा संपूर्ण व्हिडीओ शेवटपर्यंत….
आणखी वाचा :
Holi 2024 : होळीच्या सणासाठी हे पारंपारिक ड्रेस आहेत बेस्ट पर्याय