- Home
- lifestyle
- Nita Ambani Luxury Collection : २४० कोटींचं जेट ते कोट्यवधींचे दागिने; पाहा नीता अंबानींचा थाट
Nita Ambani Luxury Collection : २४० कोटींचं जेट ते कोट्यवधींचे दागिने; पाहा नीता अंबानींचा थाट
अंबानी कुटुंब त्यांच्या रॉयल लाइफस्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतं. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी त्यांच्या महागड्या फॅशन, कार्स आणि लक्झरी वस्तूंमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. पाहा त्यांचं कलेक्शन.

एअरबस A319 प्रायव्हेट जेट
नीता अंबानींकडे 'एअरबस A319' हे स्वतःचं आलिशान प्रायव्हेट जेट आहे. मुकेश अंबानींनी २००७ मध्ये त्यांच्या वाढदिवसाला हे विमान गिफ्ट दिलं होतं. त्यावेळी या जेटची किंमत तब्बल २४० कोटी रुपये होती. या विमानात कस्टम ऑफिस, अटॅच बाथरूमसह मास्टर बेडरूम, डायनिंग एरिया आणि स्काय बार आहे. तसंच यात सॅटेलाइट टीव्ही, म्युझिक सिस्टीम, गेमिंग झोन आणि वायरलेस कम्युनिकेशनची सुविधाही आहे.

डायमंड नेकलेस
नीता अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये एक अतिशय सुंदर पाचूचा (एमराल्ड) आणि हिऱ्यांचा हार आहे. तज्ज्ञांच्या मते, या भव्य हाराची किंमत ४०० ते ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. मार्च २०२४ मध्ये गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात त्यांनी हा लक्षवेधी हार घातला होता.
रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज
नीता अंबानी अतिशय महागडी 'रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज' चालवतात. मुकेश अंबानींनी २०२३ च्या दिवाळीत त्यांना ही लक्झरी एसयूव्ही गिफ्ट दिली होती. या कारची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. या ब्रिटिश लक्झरी कारमध्ये ६.७५-लिटरचं V12 ट्विन-टर्बो इंजिन आहे. अंबानी कुटुंबाने ही कार खास 'ऑरेंज टस्कन सनशेड' रंगात कस्टमाइज करून घेतली आहे.
हर्मीस हिमालया बिर्किन हँडबॅग
नीता अंबानींकडे अतिशय खास अशी 'हर्मीस हिमालया बिर्किन' हँडबॅग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दुर्मिळ बॅगची किंमत २.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बर्फाच्छादित हिमालयासारखा लूक देण्यासाठी यात पांढऱ्या आणि राखाडी रंगाचा वापर केलाय. या लक्झरी ब्रँडने ही बॅग १८-कॅरेट व्हाईट गोल्ड हार्डवेअर आणि २४० पेक्षा जास्त हिरे जडून तयार केली आहे.
नोरिटेक' टी-सेट
नीता अंबानी त्यांच्या पाहुण्यांना प्रीमियम 'नोरिटेक' टी-सेटमध्ये चहा देतात. रिपोर्ट्सनुसार, या जपानी टेबलवेअर सेटची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये आहे. नोरिटेक ब्रँड त्यांच्या लक्झरी पोर्सिलेन आणि डिनर सेटसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अंबानी कुटुंबाने याचा एक स्पेशल एडिशन सेट विकत घेतलाय, ज्यातील कपांवर खऱ्या सोन्याचं आणि प्लॅटिनमचं प्लेटिंग आहे.
मुघलकालीन बाजूबंद
नीता अंबानींच्या ज्वेलरी बॉक्समध्ये भारतीय इतिहासातील एक दुर्मिळ दागिना आहे. त्यांनी २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुघलकालीन बाजूबंद विकत घेतलाय. मुघल सम्राट शाहजहान हाच दागिना त्याच्या पगडीवर घालायचा. मार्च २०२४ मध्ये मुंबईत झालेल्या ७१ व्या मिस वर्ल्ड फायनलमध्ये नीता अंबानींनी हा ऐतिहासिक दागिना आपल्या दंडावर घातला होता.

