सार
लिंक्डइनवर मुख्यरुपात बहुतांशजण नोकरीच्या शोधात येतात. पण आता लिंक्डइनवर तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकसारखे शॉर्ट व्हिडीओ पाहता येणार आहेत. या फीचर संदर्भात कंपनीकडून काम केले जात आहे.
LinkdIn New Feature : लिंक्डइनचा खासकरून नोकरी शोधण्यासाठीचे एक प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्हाला जगभरातील कंपन्यांमधील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात आणि तुम्ही नोकरीसाठी अर्जही करू शकता. पण सध्या कंपनी टिक-टॉक, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओ फीडवर काम करतेय. याच फीचरबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
मायक्रोसॉफ्टचे मालकी हक्क असणाऱ्या लिंक्डइनवर शॉर्ट-व्हिडीओ पाहण्याच्या फीचरवर कंपनी काम करत आहे. हे फीचर रोलआउट केल्यास लिंक्डइन देखील इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि युट्यूबसारख्या लोकप्रिय अॅपपैकी एक होईल. या प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच शॉर्ट-व्हिडीओ युजर्सला पाहता येतात.
कसे दिसणार शॉर्ट व्हिडीओ फीड?
रिपोर्ट्सनुसार, शॉर्ट व्हिडीओ पाहण्याचा पर्याय Navaigation Bar मध्ये एक नव्या 'व्हिडीओ टॅब' मध्ये दिसणार आहे. ज्यावेळी तुम्ही नव्या व्हिडीओ बटणावर टॅप कराल त्यावेळी शॉर्ट व्हिडीओ दिसतील. अशाप्रकारे एकामागोमाग एक असे अनेक व्हिडीओ उभ्या आकारात तुम्हाला पाहता येणार आहेत. युजर्सला व्हिडीओ लाइक किंवा दुसऱ्यांसोबतही शेअर करता येणार आहे. याशिवाय व्हिडीओवर कमेंट्सही करू शकता. सध्या अशी माहिती समोर आलेली नाही की, युजर्स कशा पद्धतीने व्हिडीओ पाहू शकतात.
गेम्सही सुरू करणार कंपनी
टेक क्रंचच्या (Techcrunch) रिपोर्ट्सनुसार, युजर्स लिंक्डइनवरील युजर्सला अधिक वेळ अॅपवर घालवण्यासाठी गेम्सही उपलब्ध करून देणार आहेत. यामध्ये पझल्स आणि वर्ड-बेस्ड गेम्स असणार आहेत. गेम्ससंदर्भात लिंक्डइनच्या एका प्रवक्त्यांनी पुष्टी केलीय की, कंपनी गेम्सवर काम करत आहे. सध्या गेम्स कधी लाँच केले जातील याबद्दल माहिती नाही.
आणखी वाचा :
WhatsApp स्टेटस टॅग करता येणार, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल सविस्तर...
वाहन परवाना तयार करणे झालेय सोपे, असा करा ऑनलाइन पद्धतीने अर्ज
ज्या देशात दहशतवादी हल्ले आणि आर्थिक मंदी तरीही भारतापेक्षा अधिक आनंदी