ज्या देशात दहशतवादी हल्ले आणि आर्थिक मंदी तरीही भारतापेक्षा अधिक आनंदी

| Published : Mar 22 2024, 05:02 PM IST

Happiness

सार

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक आनंदी देश असल्याचे सांगण्यात आहे. भारताचा या यादीत १२६ वा क्रमांक असून पाकिस्तान १०८ व्या स्थानी आहे.

दिल्ली:  ऐकावे ते नवलचं ! चक्क ज्या देशात दहशतवादी हल्ले आणि आर्थिक मंदी सुरु आहेत तो देशात आपल्या भारतापेक्षा जगाच्या क्रमवारीत खुश आहे. होय पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक आनंदी देश असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आले आहे. भारत आनंदी देशांमध्ये १४३ देशांच्या यादीत १२६ व्या स्थानावर असून, त्या तुलनेत पाकिस्तान मात्र १०८ व्या स्थानावर आहे.

भारतापेक्षा क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने कमी असलेले देश देखील भारतापेक्षा खुश असल्याचे दिसत आहे. भारताच्या वर असलेले १२५ वे स्थान जॉर्डन या देशाचे असून, १२४ व्या स्थानी टोगो, १२३ व्या स्थानी मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. त्यावर माली, लिबिया, घाना, उगांडा, केनिया, युक्रेन सारखे देश आहेत. या यादीत चीन ६०व्या, नेपाळ ९३व्या मॅनमार ११८ व्या स्थानावर आहे.

आनंदी असण्याचा क्रिटेरिया काय?

हा अहवाल तयार करण्यासाठी ६ प्रकारच्या पॅरामीटर्सवर आधारित प्रश्नावली तयार करण्यात येते. यामध्ये देशातील प्रत्येकाचे उत्पन्न, सामाजिक स्थिती, जेनेरोसिटी, भ्रष्टाचार, समाजातील स्वातंत्र्य, आरोग्य या घटकांच्या आधारे आनंदी देश कोणता याचे स्थान ठरविण्यात आले आहे.

सर्वात आनंदी देश कोणता?

फिनलंडने सलग सातव्यांदा जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. या ठिकाणी केवळ ५५ लाख लोकसंख्या आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान या यादीत शेवटच्या स्थानावर आहे. अहवालानुसार सर्वाधिक आनंदी देशांमध्ये युरोपियन देश आहेत.

भारतात वृद्ध खूश का आहेत?

भारतात साठी पार केलेले नागरिक तरुणांच्या तुलनेत अधिक खूश आहेत. यातही भारतीय वृद्ध पुरुष महिलांच्या तुलनेत अधिक आनंदी आहेत. संपूर्ण जगातच प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत आनंदी महिला कमी आहेत.

बड्या देशांचे स्थान घसरले:

१० वर्षात प्रथमच अमेरिका आणि जर्मनी प्रमुख आनंदी देशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ते २३ व्या आणि २४ व्या स्थानावर पोहोचले आहेत. अमेरिकेचे स्थान गेल्या वर्षी 16 वे होते. या वर्षी कॅनडा देश या यादीत 15 व्या स्थानी आहे.

भारताच्या आजूबाजूला काय?

आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान १२६ वे असून, त्यानंतर १२७ व्या स्थानावर इजिप्त आहे. तर १२८ व्या स्थानावर श्रीलंका आहे. १२९ व्या स्थानावर बांगलादेश आहे. १३०व्या स्थानावर इथोपिया आहे. १३१ स्थानावर टांझानिया हा देश आहे.

सर्वांत आनंदी देश कोणते?

1) फिनलँड

2) डेन्मार्क

3) आईसलँड

4)स्वीडन

5) इस्रायल

6) नेदरलँड

7) नॉर्वे

8)लक्झेंबर्ग

9) स्वित्झर्लंड

10) ऑस्ट्रेलिया

आणखी वाचा :

World Water Day: 'जल है तो जीवन हे' ,पाणी नसेल तर सजीव आणि झाडांचा विनाश निश्चित

Health : रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका, या गोष्टीमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास

खजूर खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?