वाहन परवाना तयार करणे झालेय सोपे, असा करा ऑनलाइन पद्धतीने अर्ज
वाहन परवाना तयार करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी parivahan.gov.in संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळाच्या माध्यमातून वाहन परवाना काढता येणार आहे.
वाहन परवाना तयार करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे. यानंतर मोबाइलवर एक ओटीपी येईल तो देखील द्या.
ओटीपी दिल्यानंतर वाहन परवानासाठी एक फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनेच चाचणी द्यावी लागेल. यानंतर लर्निंग परवाना येईल.
लर्निंग परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर एका महिन्यानंतर मूळ परवानासाठी अर्ज करू शकता.
मूळ वाहन परवानासाठी अर्ज केल्यानंतर चाचणीसाठी तुम्हाला आरटीओच्या कार्यालयात जावे लागणार आहे. तेथे ड्रायव्हिंग चाचणी पास झाल्यानंतर परवाना मिळेल.