WhatsApp स्टेटस टॅग करता येणार, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल सविस्तर...
युजर्ससाठी व्हॉट्सअॅप इंस्टाग्रामप्रमाणे असे फीचर आणणार आहे, ज्यामध्ये मित्रपरिवाराला टॅग करता येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या फीचरवर काम सुरू आहे.
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरची माहिती Wabetainfo ने दिली आहे. या फीचरची चाचणी व्हॉट्सअॅप अॅन्ड्राइडच्या बीटा वर्जन 2.24.6.10 वर सुरू आहे.
Webetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप एका धमाकेदार फीचवर काम करत आहे, जे स्टेटस संदर्भातील आहे. यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणालाही स्टेटसमध्ये टॅग करू शकता.
रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप युजर्सला आपल्या स्टोरी किंवा स्टेटसवर मोबाइलच्या कॉन्टॅक लिस्टमधील व्यक्तींना टॅग करता येणार आहे.
व्हॉट्सअॅपचे फीचर इंस्टाग्राम आणि फेसबुकसारखेच आहे. यामध्ये तुम्ही स्टेटसवर कोणालाही टॅग करू शकता. यानंतर युजर्सला टॅग केल्याचे नोटिफिकेशन मिळणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅपवर सध्या नव्या फीचरची चाचणी सुरू आहे. यामुळे लवकरच युजर्ससाठी लाँच केले जाणार आहे.