धनत्रयोदशीला सोने का खरेदी करावे? कारणे माहिती झाल्यास तुम्हीही लगेच कराल सोन्याची खरेदी
Lifestyle Nov 09 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
धनत्रयोदशी कधी आहे? (Dhantrayodashi 2023)
धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस सोने खरेदी करण्यासाठी फार शुभ मानला जातो.
Image credits: Getty
Marathi
धनत्रयोदशीला का खरेदी करावे सोने?
धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यामागील कारण खूप कमी लोकांना माहिती आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ का मानले जाते?याची माहिती जाणून घेऊया.
Image credits: Getty
Marathi
सुख-समृद्धी मिळते
धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्यास सुख-समृद्धीत वाढ होते, असे मानले जाते. म्हणूनच लोक या दिवशी सोने खरेदी करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात. यामुळे जीवन सुखमय होते.
Image credits: Getty
Marathi
सोने हा गुरू ग्रहाचा धातू
गुरू हा शुभ फळ देणारा ग्रह आहे. वैवाहिक जीवनातही या ग्रहाची महत्त्वाची भूमिका असते. धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्यास गुरू ग्रहाशी संबंधित शुभ फळ प्राप्त होते, असे म्हणतात.
Image credits: Getty
Marathi
सोने खरेदी या कारणामुळेही केली जाते
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि हा कलश सोन्याचा होता, असे म्हटले जाते. या मान्यतेमुळेही सोने खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते.
Image credits: Getty
Marathi
देवी लक्ष्मीचे स्वरूप
हिंदू धर्मामध्ये धनाची देवता म्हणून लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. म्हणून धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीने आपल्या घरात यावे, याच इच्छेनुसार सर्वजण देवीला पूजतात व सोने खरेदी करतात.
Image credits: Getty
Marathi
लग्न मुहूर्त
दीपावलीनंतर लग्न मुहूर्तास सुरुवात होते. लग्नापूर्वी वधूवरासाठी सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. सोन्याची खरेदी शुभ मुहूर्तावर करण्याच्या उद्देशाने धनत्रयोदशीला खरेदी केली जाते.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा करत नाही.