सार

Dhantrayodashi 2023 : दरवर्षी दिवाळी सणापूर्वी (Diwali 2023) धनत्रयोदशीचा (Kadhi Ahe Dhanteras 2023) सण साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवता कुबेर यांच्याव्यतिरिक्त भगवान धन्वंतरी यांचीही पूजा केली जाते.

Dhanteras 2023 Date, Time, Shubh Muhurat : धार्मिक शास्त्रानुसार धनत्रयोदशीचा सण (Dhantrayodashi 2023) दरवर्षी दिवाळी सणाच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो. या दिवशी महालक्ष्मीची पूजा, भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याची आणि यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करण्याचीही परंपरा आहे. आश्विन वद्य त्रयोदशी तिथिला हा सण साजरा केला जातो.

पण यंदा एक नव्हे तर दोन दिवस तिथि दिसत असल्याने सण साजरा करण्याबाबत लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे. पण चिंता करू नका. धनत्रयोदशी सण साजरा करण्याची अचूक तारीख, पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्ताबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया…

धनत्रयोदशी सण 2023 नेमका कधी साजरा करावा? (Dhanteras 2023 Date)

पंचांगानुसार, यंदा आश्विन वद्य त्रयोदशी तिथि 10 नोव्हेंबर 2023 या दिवशी दुपारी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांपासून सुरू होणार असून ते दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर 2023 दुपारी 01 वाजून 57 मिनिटांपर्यंत असेल. धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करण्याची व संध्याकाळी पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे हा उत्सव शुक्रवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल.

धनत्रयोदशी 2023 : पूजा व खरेदी करण्यासाठी मुहूर्त (Dhanteras 2023 Puja Muhurat)

  • शुक्रवारी (10 नोव्हेंबर 2023) धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05 वाजून 47 मिनिटांपासून ते 07 वाजून 43 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच पूजा करण्यासाठी 01 तास 56 मिनिटे इतका कालावधी असेल.
  • यम दीपदानासाठी प्रदोष काल : संध्याकाळी 05 वाजून 30 मिनिटांपासून ते 08 वाजून 08 मिनिटांपर्यंत असेल.
  • हा संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ राहील.
  • धनत्रयोदशीला लक्ष्मीला पूर्ण धने आणि गुळाचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवला जातो.

चौघडिया शुभ मुहूर्त : 10 नोव्हेंबर

  • चर : सकाळी 06.44 वाजेपासून ते सकाळी 08.09 वाजेपर्यंत
  • लाभ :  सकाळी 08.09 वाजेपासून ते सकाळी 09.33 वाजेपर्यंत
  • अमृत : सकाळी 09.33 वाजेपासून ते सकाळी 10.58 वाजेपर्यंत
  • शुभ : दुपारी 12.22 वाजेपासून ते दुपारी 01.47 वाजेपर्यंत
  • चर :  संध्याकाळी 04.36 वाजेपासून ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत
  • लाभ : रात्रौ 09.11 वाजेपासून ते रात्रौ 10.47 वाजेपर्यंत

चौघडिया शुभ मुहूर्त : 11 नोव्हेंबर

  • शुभ :  सकाळी 08.09 वाजेपासून ते सकाळी 09.33 वाजेपर्यंत
  • चर : दुपारी 12.22 वाजेपासून ते दुपारी 01.47 वाजेपर्यंत
  • लाभ : दुपारी 01.47 वाजेपासून ते दुपारी 03.11 वाजेपर्यंत
  • अमृत : दुपारी 03.11 वाजेपासून ते संध्याकाळी 04.36 वाजेपर्यंत
  • लाभ : संध्याकाळी 06.00 वाजेपासून ते संध्याकाळी 07.36 वाजेपर्यंत
  • शुभ : रात्रौ 09.11 रात्रौ वाजेपासून ते रात्रौ 10.47 वाजेपर्यंत
  • अमृत: रात्रौ 10.47 रात्रौ वाजेपासून ते मध्यरात्री 12.23 वाजेपर्यंत
View post on Instagram
 

 

भगवान धन्वंतरी यांची कशी करावी पूजा? (Dhanteras 2023 Puja Vidhi)

  • धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठवून स्नान करून पूजा-व्रत करण्याचा संकल्प करावा.
  • स्वच्छ पोशाख परिधान करून संध्याकाळी शुभ मुहूर्तावर भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ ठिकाणी स्थापित करावी.
  • खाली दिलेल्या मंत्राचा जप करून भगवान धन्वंतरी यांचे आवाहन करा.

सत्यं च येन निरतं रोगं विधूतं, अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।

गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।

  • भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेसमोर अक्षता अर्पण करा. आचमनासाठी पाणी सोडावे. यानंतर गंध, अबीर, गुलाल पुष्प, कुंकू इत्यादी एक-एक गोष्टी अर्पण कराव्यात. यानंतर वस्त्र अर्पण करावे. विड्याचे पान, लवंग, सुपारी देखील अर्पण करावी.
  • भगवान धन्वंतरी यांना नैवेद्य दाखवावा. शंखपुष्पी, तुळस, ब्राह्मी वगैरे औषधे वनस्पतीही अर्पण करावी. तसेच श्रीफळ व दक्षिणाही अर्पण करा. पूजाविधि पूर्ण झाल्यानंतर आरती देखील करावी.

आणखी वाचा :

700 Year Old Ganesha Idol धगधगत्या ज्वालामुखीवर 700 वर्षांपासून विराजमान आहे बाप्पा, पूजेत कधीही पडत नाही खंड

Health Benefits Of Banana Leaf : केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे माहितीयेत? मिळतील इतके अद्भुत लाभ

Saat Kappyache Ghavane : कोकणातील पारंपरिक सात कप्प्यांचे घावणे, जाणून घ्या रेसिपी

(Disclaimer : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा करत नाही. )