सार

ज्वालामुखीच्या या पर्वतावर गेल्या 700 वर्षांपासून गणपती बाप्पाची (700 Year Old Ganesha Idol In Marathi) मूर्ती विराजमान आहे. स्थानिक या मूर्तीची दररोज मनोभावे पूजा करतात.

गणपती बाप्पा मोरया l

मंगलमूर्ती मोरया ll

एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यापूर्वी श्री गणेशाचे (Shree Ganesh Puja) पूजन करण्याची परंपरा व शास्त्र आहे. घरामध्ये गणेशपूजन करणं शक्य नसेल तर मंगल कार्य अडथळ्यांविना पार पडावे, यासाठी भाविक बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेतात. बाप्पाचे लाडके भक्त दरवर्षी गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) तर जल्लोषात-धुमधडाक्यात साजरा करतात. या 10 दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा करण्यामध्ये भाविक दंग असतात.    

(वाचा : Saat Kappyache Ghavane : कोकणातील पारंपरिक सात कप्प्यांचे घावणे, जाणून घ्या रेसिपी)

या उत्सवानंतरही बाप्पा आणि भाविकांमधील संवाद कायम सुरूच असतो. आपणास श्री सिद्धिविनायक (Shree Siddhivinayak Temple Mumbai), श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati mandir) यासह देशभरातील अनेक प्रसिद्ध मंदिर आपणास माहितीच असतील. येथेही दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असतेच. 

ज्वालामुखीच्या पर्वतावरील बाप्पाचे मंदिर 

पण ज्वालामुखीच्या काठावर असलेल्या गणपती मंदिराला आपण कधी भेट दिलीय का? कुठे आहे हे मंदिर? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का. तर मंडळींनो गणपती बाप्पाचे हे मंदिर (Lord Ganesha Idol On Volcano) इंडोनेशियातील माउंट ब्रोमो (Mount Bromo Ganesha Idol) या ठिकाणी आहे. 

विशेष म्हणजे ही गणेश मूर्ती (700 Year Old Ganesha Idol) तब्बल 700 वर्षे जुनी असल्याचे म्हटले जात आहे. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे माउंट ब्रोमो हे ठिकाण सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. तर या ठिकाणी असलेला गणपती बाप्पा ज्वालामुखीच्या उद्रकेपासून स्थानिक रहिवाशांचे संरक्षण करतो, असा येथील लोकांचा विश्वास आहे.

गणेश मंदिराची खासियत

या ज्वालामुखीच्या परिसरात राहणारे नागरिक ‘टेंगर’ ( Bromo Tengger) या नावाने ओळखले जातात. हे लोक भगवान श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात. दुसरीकडे सध्याच्या नोंदणीनुसार, इंडोनेशियातील 141 ज्वालामुखीपैकी 130 ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत, त्यापैकीच एक म्हणजे ‘माउंट ब्रोमो’ हे ठिकाण. याच माउंट ब्रोमो ठिकाणी ही गणेशाची मूर्ती गेल्या 700 वर्षांपासून असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पूर्वजांनीच या मूर्तीची स्थापना केल्याचे त्यांचं म्हणणं आहे.

View post on Instagram
 

Instagram Video Credit @onelifetravelworld / @ubudricefieldhouse

पर्वतास ‘ब्रोमो’ हे नाव कसे मिळाले?

Javanese भाषेच्या भगवान ‘ब्रह्मा’ शब्दाच्या उच्चारणानुसार या पर्वताचे नाव ‘ब्रोमो’ असे ठेवण्यात आले, असे म्हटलं जाते. हा ज्वालामुखी पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू नॅशनल पार्क येथे आहे. विशेष बाब म्हणजे येथे ज्वालामुखीचा उद्रेक जरी झाला तरी गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये कधीही खंड पडत नाही.

पूजेदरम्यान येथे फुले वाहून, फळांचा नैवेद्यही बाप्पाला अर्पण केला जातो. असे न केल्यास ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे परिसरातील नागरिकांचे आयुष्य धोक्यात येईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

View post on Instagram
 

Instagram Video Credit @travel_save

गणेशमूर्तीशिवाय ‘ब्रोमो पर्वत’ या कारणांसाठीही आहे प्रसिद्ध

माउंट ब्रोमो हे ठिकाण जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. देश-परदेशातील नागरिक या ठिकाणाला मोठ्या संख्येनं भेट देताहेत. कारण

  • डोळ्यांचे पारणे फेडणारे सूर्योदयाचा क्षण
  • वाळवंटामध्ये जीप राइड अ‍ॅडव्हेंचर (Jeep Adventure ) अनुभवण्याची संधी
  • वाळवंटामधील घोडेस्वारी

येथे अनुभवण्यास मिळणाऱ्या Adventure Activities मुळे हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण झाले आहे.

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचे जबरदस्त फायदे

एवढ्याशा काळ्या मिरीचे नियमित सेवन केल्यास मिळतील अगणित लाभ