सुख, शांती, समृद्धी-भरभराट मिळवायची असेल तर या शुभ मुहूर्तांवर लक्ष्मीपूजन करा.
यंदा दीपोत्सवास 12 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या उत्सवात संध्याकाळी शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजा केली जाते. काही जण रात्रीच्या वेळेसही लक्ष्मीपूजन करतात.
लक्ष्मी हे सौंदर्य, प्रेम आणि वैभवाचे प्रतिक आहे. दिवाळी सणादरम्यान लक्ष्मीपूजन कोणत्या वेळेस करणे शुभ ठरेल, जाणून घ्या सविस्तर माहिती...
परंपरेनुसार आश्विन महिन्यात अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा अमावस्या तिथि 12 नोव्हेंबरला दुपारी 02.44 वाजेपासून ते सोमवारी (13 नोव्हेंबर) दुपारी 02.56 वाजेपर्यंत असणार आहे.
लक्ष्मीपूजनासाठी सर्वात शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.39 वाजेपासून ते 07.35 वाजेपर्यंत आहे. त्यानुसार पूजेसाठी 1 तास 56 मिनिटे इतका कालावधी असेल.
काही जण दीपोत्सवामध्ये रात्रीच्या वेळेस लक्ष्मीपूजन करतात. ही मंडळी रात्रौ 11.39 वाजेपासून ते 12.32 वाजेपर्यंत पूजा करू शकतात.
स्थिर लग्न हे पूजा इत्यादी कार्यात शुभ मानले जाते. दिवाळीत सिंह लग्न मुहूर्त रात्रौ 12.10 वाजेपासून ते मध्यरात्री 02.27 वाजेपर्यंत आहे. यावेळेसही लक्ष्मीपूजन करणे शुभ मानले जाते.
लक्ष्मीपूजन वृषभ या स्थिर लग्नावर केले तरी उत्तम. कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, तो आनंदाचा कारक आहे, असे मानतात. हा मुहूर्त संध्याकाळी 06.13 वाजेपासून ते 06.44 वाजेपर्यंत आहे.
दुकान, ऑफिस, कारखान्यात लक्ष्मीपूजन करण्यासाठी संध्याकाळी 05.29 वाजेपासून ते रात्रौ 10.26 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा करत नाही.