सार

बहुतांशजणांना केएफसीच्या मेन्यूमधील फ्राइड चिकन फार आवडते. खरंतर, फ्राइड चिकनची रेसिपी तुम्ही घरच्याघरी देखील तयार करू शकता. जाणून घेऊया रेसिपी सविस्तर...

Fried Chicken Recipe : विकेंड पार्टी किंवा घरी बच्चे कंपनीसाठी तुम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करून कंटाळा असाल तर केफसीसारखे फ्राइड चिकनची रेपिसी नक्की ट्राय करा. यासाठी लागणारे सामग्री आणि कृती जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप....

सामग्री

  • अर्धा किलो चिकन
  • 2 कप मैदा
  • चवीनुसार मीठ
  • 2 चमने काळी मिरी पावडर
  • 1 चमचा लाल तिखट
  • दीड चमचा आलं-लसूण पेस्ट
  • ओवा
  • ड्राय बेसिलची पाने
  • एक कप ताक
  • तळण्यासाठी तेल

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात ताक, एक चमचा मीठ, एक चमचा काळी मिरी पावडर, एक चिमुटभर लाल तिखट मिक्स करून त्यात चिकनचे तुकडे टाका. चिनक व्यवस्थितीत मॅरिनेशन होण्यासाठी दोन तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.
  • एका भांड्यात मैदा, मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट, ओवा, ड्राय बेसिल किंवा मिक्स हर्ब्स एकत्रित करून घ्या. यामध्ये मॅरिनेशन केलेले चिकनचे तुकडे टाका. अशाप्रकारचे फ्राइड चिकनचे कोटिंग तयार होईल.
  • चिकनच्या तुकड्यांना डबल कोटिंग करण्यासाठी पुन्हा ताकाच्या मिश्रणात मिक्स केल्यानंतर मैद्याच्या मिश्रणात बुडवा.
  • आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मॅरिनेशन केलेले चिकनचे तुकडे तळून घ्या. चिकन तळताना कढईत अतिरिक्त तेलाचा वापर करू नका.
  • चिकनचे तुकडे डिप फ्राय करा आणि गोल्डन रंग येई पर्यंत तळून घ्या. आता कढईतून तळलेले चिकनचे एका प्लेटमध्ये काढून घ्या. चिकनमध्ये अतिरिक्त तेल राहू नये म्हणून तुम्ही प्लेटमध्ये नॅपकिन पेपर ठेवून त्यावर फ्राइड चिकन काढून ठेवू शकता.
  • आता गरमागरम फ्राइड चिकन विकेंड पार्टी किंवा बच्चे कंपनीला मिरचीची चटणी किंवा सॉससोबत खायला सर्व्ह करू शकता.

आणखी वाचा : 

जिलेबी तळण्याची ही पद्धत पाहून व्हाल अव्वाक, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

असा इडली सांबार कधी खाल्लाय का? व्हायरल व्हिडीओला पाहून म्हणाल... (Watch Video)

Jalebi Recipe : अयोध्येतील प्रसिद्ध जिलेबी तयार करा घरच्याघरी, पाहा ही सोपी रेसिपी