थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ तयार केल्यानंतर लवकर थंड होतात. अशातच अन्नपदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी काही घरगुती ट्रिक्स वापरू शकता. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर...

Food Hacks in Winter : थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. शरिराला थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार वस्र परिधान केले जातात. पण थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ लवकर थंड होतात. यामुळे तयार केलेले अन्नपदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. खरंतर, अन्नपदार्थ वारंवार गरम केल्याने त्यामधील पोषण तत्त्वे दूर होतात. याच समस्येपासून दूर राहण्यासाठी पुढील काही सोप्या ट्रिक्स नक्कीच ट्राय करू शकता.

अ‍ॅल्यूमिनियम फॉइलचा वापर

थर्मल बॅग


थर्मल बॅगच्या मदतीनेही थंडीत पदार्थ दीर्घकाळ गरम ठेवू शकता. यासाठी वृत्तपत्र, प्लास्टिक आणि कापडाच्या वस्राचे काही लेअरचा वापर करून एक इंलुलेटेड कॅरियर तयार करा. हीट सील करण्यासाठी तयार केलेले अन्नपदार्थ थर्मल बॅगमध्ये भरुन ठेवा.

पितळेच्या भांड्यांचा वापर


थंडीच्या दिवसात कास्य किंवा पितळेच्या भांड्याचा वापर करुन अन्नपदार्थ दीर्घकाळ गरम ठेवू शकता. या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने ते गरम राहण्यासह त्यांची चवही अधिक वाढली जाते.

आणखी वाचा : 

वापरलेली चहापावडर फेकू नका, केस ते कपड्यांसाठी असा करा वापर

अळशीच्या बियांचे सेवन करणे पुरुषांसाठीही ठरेल वरदान, वाचा फायदे