अळशीच्या बियांमध्ये काही पोषण तत्त्वे असतात. याचे सेवन केल्याने पुरुषांना कही आरोग्यदायी फायदे होतात. याबद्दल पुढे जाणून घेऊया...
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, कॉपर,कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकसारखी पोषण तत्त्वे असतात. यामुळे आरोग्यासंबंधित काही आजारांपासून तुम्ही दूर राहता.
अळशीच्या बियांमध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात. याच्या सेवनाने पुरुष मंडळी प्रोस्टेट कॅन्सरपासून दूर राहू शकतात.
अळशीच्या बियांचे भिजवून सेवन केल्यास पुरुषांमधील फर्टिलिटीची समस्या दूर होण्यास मदत होते.
बहुतांश पुरुष मंडळी केस गळतीच्या समस्येने त्रस्त असतात. यासाठी अळशीच्या बियांचे सेवन केल्याने केस हेल्दी राहण्यास मदत होते.
अळशीच्या बियांचे सेवन केल्याने पुरुष मंडळी युरिन इन्फेक्शनसह त्यासंदर्भातील समस्यांपासून दूर राहू शकतात.
अळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. याच्या सेवनाने दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि ओव्हरइटिंगपासून दूर राहता. याशिवाय वजन कमी होण्यासही अळशीच्या बियांमुळे मदत होते.
अळशीच्या बियांचे सेवन केल्याने रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे, हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही मदत होते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.