चहा तयार केल्यानंतर त्यामध्ये राहिलेली चहापावडर फेकून देतात. पण याच वापरलेल्या चहापावडरचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.
वापरलेल्या चहापावडरमध्ये नाइट्रोजन आणि काही नैसर्गिक गुणधर्म असतात जे रोपांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. वापरलेली चहापावडर सुकवून रोपांना खत म्हणून वापरू शकता.
गडद रंगांच्या कपड्यांची चमक लवकर निघून जाते. अशातच वापरलेल्या चहापावडरच्या पाण्यामध्ये कपडे भिजवून ठेवल्याने कपड्यांची चमक वाढते आणि दुर्गंधीही निघून जाते.
वापरलेली चहा पावडर गाळून घेतल्यानंतर पुन्हा पाण्यात उकळवून घ्या. यामधून निघालेल्या पाण्याने केस धुवा. हे पाणी नैसर्गिक रुपात कंडीशनर म्हणून केसांसाठी काम करते.
वापरलेली चहा पावडर धुवून त्याचा फेस स्क्रबच्या रुपात वापर करू शकता. यामुळे त्वचेवरील डेड स्किन दूर होईल.
वापरलेल्या चहापावडरमध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे कीटे आणि मुंग्या दूर पळतात.
वापरलेली चहापावडर भांडी, सिंक किंवा स्टीलच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.
वापरलेली चहापावडरची बॅग फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर होतील.