सार
उन्हाळ्यात वाढत्या तापमानानुसार शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत चालते.वेळोवेळी पाणी न पिल्याने डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. डिहायड्रेशन कशामुळे होत आणि त्यासाठी उपाय कोणते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
लाईफस्टाईल डेस्क : डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण कशामुळे होतं? शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसून येतात आणि त्यावर उपाय यासंदर्भात जाणून घेऊयात…
साधारणतः उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. किंवा उष्णता वाढल्यास अथवा शरीराचं तापमान वाढल्यास डिहायड्रेशन होऊ लागते. त्यामुळे डिहाड्रेशनची लक्षणेही ओळखता यायला आली पाहिजे. कारण ही लक्षणं दिसली तर व्यक्ती बेशुद्ध पडण्याआधीच त्यावर वेळीच उपचार किंवा उपाय करू शकतो.
- तहान लागणे, तोंड कोरडे पडणे ही प्राथमिक लक्षणं दिसू लागताच पुरेसे पाणी प्यावे.
- वात येणे, डोकेदुखी, चक्कर आदी त्रासांची वाट न पाहता भरपूर पाणी प्यावे.
- शरीरातून घाम, मूत्र, मल, पाणी कमी होत असते. यासह काही प्रमाणात क्षारही बाहेर पडतात.
- ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी उन्हाळ्यात किंवा अती धावपळ झाल्यास आणि शरीराचं तापमान वाढल्यास पाण्याचं उत्सर्जन होण्याचा वेग वाढतो. जर पाण्याचे शरीरातील योग्य प्रमाण राखले नाही, तर निर्जलीकरणाचा त्रास सुरू होतो.
- मूत्राचा रंग जर पिवळसर, गडद पिवळा दिसू लागला तर निर्जलीकरणाचे ते प्रमुख लक्षण मानलं जातं.
- शरीरात पाण्याचे योग्य संतुलन राखल्यास लघवीचा रंग फिकट किंवा रंगहीन दिसतो.
- तहान लागण्याची वाट पाहू नका, तुमचे तोंड कोरडे पडते, त्यावेळी तुमच्या शरीरात निर्जलीकरण प्रक्रिया सुरू झाल्याचे समजावे.
- लघवीचा रंगही आपण किती प्रमाणात पाणी प्यावे हे सांगणारा निदर्शक आहे.
- आपली पाण्याची गरज आपल्या वजनावर अवलंबून असते. खेळ, व्यायाम अथवा उन्हात वावर असल्यास अधिक पाण्याची गरज भासते. पाणी पिण्याची सवय लागण्यासाठी पाण्याची बाटली सतत सोबत ठेवा.
- खरबूज, काकडी, टोमॅटो, किलगड खाल्ल्यानेही शरीराला पाणी व उपयुक्त घटक, खनिजे मिळतात. शहाळ्याचे पाणी शरीरात ऊर्जा निर्माण करते.
- लिंबू सरबत, सोलकढी, लस्सी, ताक आणि शुद्ध निरा या पेयांनी शरीरातील पाण्याची गरज तर भागतेच, शिवाय शरीराला ऊर्जा देणारे क्षारही त्यातून मिळतात.
आणखी वाचा:
36 गुण जुळले पण आरोग्याचे काय? लग्न करण्याआधी दोघांनी कराव्या या टेस्ट