सार

ज्योतिषशास्रानुसार, होळीच्या आठ दिवसांआधी होलाष्टक सुरू होते. खरंतर, होलाष्टकावेळी कोणतीही शुभ कार्य केली जात नाही. यंदा होलाष्टक कधी याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

Holashtak 2024 : ज्योतिषशास्रामध्ये अशुभ मुहूर्तांची मान्यता हजारो वर्ष जुनी आहे. होळीच्या आधीच्या आठ दिवसांना ‘होलाष्टक’ असे म्हटले जाते. या काळाला अशुभ मानले जाते. याशिवाय होलाष्टकादरम्यान, कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य असते. होलाष्टकाबद्दल वेगवेगळ्या मान्यता आणि परंपरा समाजात आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

कधीपासून सुरू होणार होलाष्टक 2024?
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, यंदा होलाष्टक येत्या 17 मार्चपासून सुरू होणार असून 24 मार्चपर्यंत असणार आहे. याशिवाय 25 मार्चला रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे.

होलाष्टकादरम्यान, कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. जसे की, विवाहसोहळा, नामकरण सोहळा, गृह प्रवेश, साखरपुडा अशी शुभ कार्य होलाष्टकावेळी केली जात नाहीत.

होलाष्टक का अशुभ आहे?
धर्मग्रथांनुसार, राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला अनेक वेळा भक्ती मार्गापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण प्रल्हादने मानले नाही. अशातच हिरण्यकश्यपू संतप्त होत त्याने प्रल्हादचा जीव घेण्याचा विचार केला. यासाठी सातत्याने आठ दिवस प्रल्हादचा जीव घेण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केल असता वेळोवेळी अपयशच हाती आले. याच आठ दिवसांना आजच्या काळात होलाष्टक असे म्हटले जाते. ज्योतिषांनुसार, होलाष्टकादरम्यान ग्रह उग्र होतात. यामुळे होलाष्टकावेळी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य असते.

होलाष्टकाबद्दल ज्योतिषांमध्ये मतभेद
होलाष्टाबद्दल ज्योतिषांमध्ये काही मतभेद आहेत. ज्योतिषाचार्य पं. द्विवेदी यांच्यानुसार होलाष्टकावेळी शुभ कार्य न करण्याची मान्यता गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आहे. देशातील अन्य राज्यात होलाष्टकाबद्दल कोणतीही मान्यता नाही.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

रंगपंचमीच्या रंगापासून अशी घ्या त्वचेची काळजी

ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगमधील फरक काय?

नीता अंबानींच्या या खास हारची संपूर्ण जगात होतेय चर्चा