हिवाळा आला कि सगळ्यांना तिळाचे लाडू खायला आवडतात. या लाडूंमुळे शरीरात उष्णता निर्माण होत असते, तसेच हे लाडू एनर्जी वाढवायला मदत करतात.
१ कप पांढरे तीळ, ¾ कप गूळ, २ टिस्पून तूप, वेलदोडा पावडर
कढईत तीळ मंद आचेवर भाजा. ते तडतडू लागले आणि सुगंध आला की ते तयार झाले. भाजल्याने लाडूंचा स्वाद आणि टेक्स्चर दोन्ही सुधारतात.
भाजलेले तीळ थोडे गार झाले की त्यांना हलकं ठेचा, बारीक नाही, फक्त क्रंच राहील.
कढईत तूप गरम करा आणि त्यात गूळ घाला. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत ढवळा. पाक चिकट आणि एकसारखा होईपर्यंत शिजवा.
गूळ पाकात भाजलेले तीळ मिसळा. हवे असल्यास वेलदोडा पावडर घाला. सगळं छान एकजीव झालं की मिश्रण तयार!
मिश्रण थोडं गरम असतानाच हाताला तूप लावून छोटे-छोटे लाडू वळा. गार झाल्यावर ते घट्ट आणि कुरकुरीत होतात.
लग्नातला खर्च करा कमी, चांदीचे मंगळसूत्र देईल मॉडर्न लूक
आईवडिलांना भेट द्या 5gm मधील स्टनिंग बँड रिंग, बघा युनिसेक्स 7 फॅन्सी डिझाइन्स
गोकर्णचा 'हा' अनोखा व्ह्यू पाहून तुम्ही वेडे व्हाल!, एकाच ठिकाणी मिळवा 4 अविस्मरणीय अनुभव!
गोल आणि लांब चेहऱ्यासाठी परफेक्ट लुक, ट्राय करा हे 6 झुमके