Face Serum for Glowing Skin : सध्या बहुतांश महिला सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. पण घरच्याघरी एक खास फेस सीरम तयार करुन चेहऱ्यावर ग्लो आणू शकतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

Homemade Face Serum : त्वचा सुंदर, तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी आज अनेकजण फेस सीरमचा वापर करतात. बाजारात मिळणारे फेस सीरम महागडे आणि केमिकलयुक्त असतात, जे दीर्घकाळ वापरल्यास साइड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरच्याघरी नैसर्गिक घटकांनी तयार केलेला फेस सीरम अधिक सुरक्षित, स्वस्त आणि त्वचेस अनुकूल ठरतो. नॅच्युरल फेस सीरममध्ये त्वचेला पोषण देणारे घटक असतात जे चेहऱ्यावर चमक आणतात, डाग, सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेला हायड्रेट ठेवतात. खाली दिलेला फेस सीरम कोणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करता येतो.

 साहित्य:

  • १ चमचा एलोवेरा जेल
  • १ चमचा गुलाबपाणी
  • ५ थेंब टी ट्री ऑइल (जर तेलकट त्वचा असेल तर) किंवा लॅव्हेंडर ऑइल (सर्व प्रकारच्या त्वचेसाठी)
  • १/२ चमचा ग्लिसरीन (कोरड्या त्वचेसाठी उपयोगी)
  • १ कॅप्सूल व्हिटॅमिन ई ऑइल 
  • एक लहान काचेची बाटली किंवा ड्रॉपर बाटली (स्टोरेजसाठी)

असे तयार करा फेस सीरम : 

१. सर्वप्रथम एका स्वच्छ काचेच्या वाटीत एलोवेरा जेल आणि गुलाबपाणी एकत्र करून चांगले हलवून घ्यावे.

२. मिश्रणात ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल (कॅप्सूल कापून) टाका.

३. त्यानंतर टी ट्री ऑइल किंवा लॅव्हेंडर ऑइलचे थेंब टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित हलवावे.

४. हे मिश्रण मऊसर झाल्यानंतर ड्रॉपर बाटलीत भरावे.

५. हे सीरम फ्रिजमध्ये ७–१० दिवस टिकते.

वापरण्याची पद्धत:

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा हलक्या फेसवॉशने स्वच्छ करून कोरडा पुसावा. नंतर चेहऱ्यावर २–३ थेंब सीरम घेऊन हलक्या हाताने मसाज करा. विशेषतः कपाळ, गाल, नाक आणि हनुवटी या भागांवर मसाज करा. यावर कोणतेही मॉइश्चराइजर लावून झोपू नये. 

या नॅच्युरल फेस सीरमचे फायदे:

  • त्वचा हायड्रेट होते
  • डाग, मुरूमांचे व्रण आणि पिग्मेंटेशनची समस्या हळूहळू कमी होते
  • अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते
  • चेहऱ्याला नैसर्गिक तेज येते