MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Weight Loss Tips : जिम आणि डाएटच्या मदतीने वजन कसे कमी करायचे? वाचा खास टिप्स

Weight Loss Tips : जिम आणि डाएटच्या मदतीने वजन कसे कमी करायचे? वाचा खास टिप्स

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येका आपल्या हेल्थकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. यामुळे झटपट व कमी वेळात वजन कमी कसे करायचे याचा प्रयत्न बहुतांशजण करतात. वजन कमी करणे सोपे काम नाही. जाणून घेऊया जिम आणि डाएटच्या आधारे वजन कमी करण्यासाठी टिप्स.

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Jun 25 2025, 04:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
वजन कमी करण्यासाठी टिप्स
Image Credit : Getty

वजन कमी करण्यासाठी टिप्स

वजन कमी करणे ही नियोजनपूर्वक गोष्ट आहे, जी मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून असते – योग्य आहार (डाएट) आणि नियमित व्यायाम (जिम). अनेक लोक केवळ एक गोष्ट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण यशस्वी आणि शाश्वत वजन घटवण्यासाठी या दोघांचा समतोल असणे अत्यंत आवश्यक आहे. जिममध्ये नियमितपणे व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलोरीज बर्न होतात, स्नायू बळकट होतात आणि शरीर अधिक अ‍ॅक्टिव्ह होण्यास मदत होते.

25
जिम केल्याने होणारे फायदे
Image Credit : istocks

जिम केल्याने होणारे फायदे

दररोज जिममध्ये जाऊन व्यायाम केल्याने मेटाबॉलिज्म रेट वाढतो, यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः कार्डिओ प्रकारचे व्यायाम – जसे ट्रेडमिलवर धावणे, सायकलिंग, झुंबा केल्याने शरीरावरील चरबी कमी करण्यात मदत होते. तसेच वेट ट्रेनिंगच्या माध्यमातून स्नायूंना मजबूती मिळण्यासह शरीर टोन्ड होण्यास मदत होते. काहीजण HIIT (High Intensity Interval Training) सारख्या व्यायामांचे काही प्रकार करून झटपट आणि कमी वेळात वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. 

Related Articles

Related image1
सांधेदुखीच्या त्रासाने हैराण झालात? वाचा डॉ. नेने यांच्या खास टिप्स
Related image2
Office Work Load : कामाचा लोड वाढला, 40 टक्के अमेरिकन कर्मचारी सकाळी 6 वाजताच कामाला करतात सुरवात
35
डाएटकडे लक्ष द्या
Image Credit : stockPhoto

डाएटकडे लक्ष द्या

जिमला जरी आपण प्राधान्य दिलं, तरीही योग्य आहाराशिवाय वजन कमी होणे कठीण आहे. डाएट म्हणजे उपाशी राहणे नव्हे, तर संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेणे होय. कॅलोरी डेफिसिट म्हणजेच शरीराने खर्च केलेल्या कॅलोरीपेक्षा कमी कॅलोरी घेणे हे वजन कमी करण्याचे मूळ तत्त्व आहे. यासाठी आपण आहारात अधिक प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जसे अंडी, डाळी, कडधान्ये, पनीर, टोफू इत्यादी. प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि स्नायूंना पोषण तत्त्वेही मिळतात. याशिवाय फायबरयुक्त भाज्या आणि फळे खाल्ल्याने पचन सुधारते आणि भूक नियंत्रणात राहते. साखर, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, आणि प्रोसेस्ड फूड यांचा जास्त वापर टाळावा, कारण त्यातून अतिरिक्त कॅलोरी तर मिळतात पण पोषण फारसे मिळत नाही.

45
पुरेशा प्रमाणात पाणी प्या
Image Credit : Freepik

पुरेशा प्रमाणात पाणी प्या

वजन कमी करण्याच्या प्रवासात दररोज भरपूर पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो. किमान २.५ ते ३ लिटर पाणी दिवसातून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि भूकही नियंत्रित होते. याशिवाय शरीर फ्रेश वाटते. 

55
पुरेशी झोपही महत्वाची
Image Credit : stockPhoto

पुरेशी झोपही महत्वाची

वजन कमी करताना नियमित झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट करणे देखील आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि भूक वाढते. त्याचप्रमाणे तणावामुळे भावनिक खाण्याची (Emotional Eating) सवय लागते, जी वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणून, ध्यान, योग, किंवा सकारात्मक विचारसरणी यांचा अवलंब केल्यास तणाव नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
रात्री ट्रेन प्रवास करताय?, या ५ महत्त्वाच्या टिप्स तुमच्या प्रवासाचा अनुभव बदलून टाकतील!
Recommended image2
रात्री झोपताना चेहऱ्यावर चादर किंवा ब्लॅंकेट घेता का? तुम्ही खूप मोठा धोका पत्करताय!
Recommended image3
कोणतीही हेअरस्टाईल करा, लावा 6 रोज गोल्ड हेअर ॲक्सेसरीज आणि मिळवा न्यू लूक
Recommended image4
फ्लोरल-राउंड नाही, 2025 मध्ये अंगठ्यापासून जोडलेल्या जोडव्यांची फॅशन
Recommended image5
सासूला भेट द्या 5gm कॉइन गोल्ड इअररिंग्स, गोल्डन ग्रेसचा नवा लुक
Related Stories
Recommended image1
सांधेदुखीच्या त्रासाने हैराण झालात? वाचा डॉ. नेने यांच्या खास टिप्स
Recommended image2
Office Work Load : कामाचा लोड वाढला, 40 टक्के अमेरिकन कर्मचारी सकाळी 6 वाजताच कामाला करतात सुरवात
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved