Health Tips : ही भाजी करु शकते तुम्हाला मधुमेह नियंत्रणासाठी मदत
Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्यामध्येही पथ्ये पाळावी लागतात.अशातच मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा काही भाज्या आहेत त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी खास भाजी
मधुमेहांच्या रुग्णांना वातूळ पदार्थ खाणे टाळले पाहिजे असा सल्ला दिला जातो. काही भाज्या अशा आहेत ज्यांचे सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास नक्कीच मदत होऊ शकते. खरंतर, मधुमेहाच्या रुग्णांनी हेल्दी आरोग्यासह हेल्दी लाइफस्टाइल देखील फॉलो करावी असे सांगितले जाते. जाणून घेऊया कोणती ही भाजी आहे ज्याच्या सेवनाने मधुमेहावर नियंत्रण मिळवणे शक्य होऊ शकते.

भेंडीची भाजी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडीची भाजी सर्वाधिक आरोग्यदायी मानली जाते. भेंडीमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक तत्त्वे असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश केल्यास काही आरोग्यदायी फायदे देखील होतात.
मधुमेह नियंत्रणासाठी भेंडी फायदेशीर
सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे मधुमेहाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहेत. या स्थितीत औषधांसह हेल्दी आरोग्याकडे लक्ष देणेही फार महत्वाचे आहे. भेंडीमधील फायबर आणि अँटिऑक्सिडेंट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने भेंडीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
भेंडीतील फायबरचा फायदा
भेंडीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया मंदावण्यास मदत करतात. यामुळे शरीरात कार्बोहायड्रेट्सचे विघटन हळूहळू होते. रक्तातील साखरेत अचानक वाढ होत नाही. तसेच भेंडीचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. भेंडीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्ससारखी महत्वाची पोषण तत्त्वे आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. या तत्त्वांमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो. अशातच नियमितपणे भेंडीचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य राखले जाऊ शकते.
पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत
भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेटसारखे पोषण तत्त्वे असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढली जाते. तसेच भेंडीतील फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन पचनसंस्था सुरळीत राहते. तुम्ही भेंडीची भाजी, सूप किंवा इतर पदार्थांच्या स्वरुपात भेंडीचे सेवन करू शकता.
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

