Health Care : रक्तदान केल्यानंतर शरीरात थोडा थकवा निर्माण होते. यामुळे शरीराला पुन्हा उर्जा मिळण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Health Care : रक्तदान करणे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्तदान केल्याने शरीरात नवे रक्त तयार होण्यासह एखाद्या गरजू व्यक्तीचे आयुष्य वाढण्यास मदत देखील होऊ शकते. पण तुम्ही रक्तदान केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करावे याबद्दल काळजी घेतली पाहिजे. शरीरात पुन्हा उर्जा निर्माण करण्यासाठी द्रव पदार्थांसह पोषक तत्त्वांची गरज असते. खरंतर, रक्तदान करताना शरीरातून 450 मिलीलीटर पर्यंत रक्त काढले जाते. यामुळे काहीजणांना थकवा, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. अशातच रक्तदान केल्यानंतर योग्य डाएटचे सेवन करणे फार महत्वाचे असते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.

रक्तदान केल्यानंतर लगेच काय खावे?
लोहयुक्त पदार्थांचे सेवन करा
रक्तदान केल्यानंतर शरीरात लोहाची कमतरता भरून काढणे महत्वाचे असते. कारण लोहामुळे शरीरात हिमग्लोबीन निर्माण होण्यास मदत होते. यामुळे तुम्ही डाएटमध्ये काजू, खजूरसह ड्राय फ्रुट्सचे सेवन करू शकता. ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने शरीरात हिमग्लोबीनचा स्तर कायम राहण्यास नेहमीच मदत होते. याशिवाय शरीराला लगेच ताकदही मिळते.
ग्रीक योगर्ट आणि मध
ग्रीट योगर्टमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. तर मधहा साखरेचा हेल्दी सोर्स मानला जातो. या दोन्ही गोष्टींचे एकत्रितपणे सेवन केल्याने शरीराला लगेच ताकद मिळते. रक्तदानामुळे शरीरात निर्माण होणारा थकवा दूर होऊ शकतो. याशिवाय पचनक्रिया देखील सुधारली जाते.
काकडी आणि कलिंगड
रक्तदान केल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ सकते. अशातच पाणीदार फळांचे सेवन करणे महत्वाचे आहे. काकडी आणि कलिंगडमध्ये 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते. याचे सेवन केल्याने शरीर हाइड्रेट राहण्यासह थकवा दूर होण्यास मदत होते.
केळ्याचे करा सेवन
केळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये पोटॅशियम, कार्बोहाइड्रेट्स आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीराला लगेच ताकद मिळू शकते. अशातच रक्तदान केल्यानंतर तुम्ही केळ्याचे सेवन करू शकता.
रक्तदानानंतर या गोष्टींची घ्या काळजी
-रक्तदान केल्यानंतर पुरेशा प्रमाण्यात पाण्याचे सेवन करा.यामध्ये नारळपाणी किंवा फळांचा ज्यूस पिऊ शकता.
-कमीतकमी 24 तास शरीर हाइड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.
-हेव्ही वर्कआउट करणे टाळा.
-संतुलित डाएटचे सेवन करा. यामध्ये प्रोटीन, लोह आणि व्हिटॅमिन सी सारख्या पदार्थांचे सेवन करू शकता.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


