सार

Valentine Week 2024 : 7 फेब्रुवारीपासून 'व्हॅलेंनटाइन वीक' ला सुरुवात होणार आहे. उद्या 'रोझ डे' साजरा केला जाणार आहे. अशातच तुम्ही पार्टनरला झटपट आणि सुंदर असे स्वत: च्या हाताने तयार केलेले एखादे क्राफ्ट नक्कीच गिफ्ट करू शकता. 

Rose Day 2024 : प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस मानल्या जाणारा ‘व्हॅलेंनटाइन डे’ (Valentine Day) साजरा केला जातो. अशातच उद्यापासून (7 फेब्रुवारी) 'व्हॅलेंनटाइन वीक' सुरु होणार असून पहिल्या दिवशी 'रोझ डे' साजरा केला जाणार आहे. 'रोझ डे' निमित्त तुम्ही पार्टनरच्या आठवणीत आणि त्याच्या सोबत राहणारे असे गिफ्ट देऊ शकता. 

'रोझ डे' निमित्त सर्वजण लाल रंगातील गुलाबाची फुल देतात. पण तुम्ही यंदाच्या 'व्हॅलेंनटाइन डे' ला पार्टनरला सुंदर आणि खास असे एखादे क्राफ्ट तयार करून देऊ शकता. 'रोझ डे' निमित्त तुम्ही पार्टनरला पुढील प्रकारचे क्राफ्ट नक्कीच भेट देऊ शकता. 

VIDEO : 'रोझ डे' दिनिमित्त पार्टनरला द्या पेपरपासून तयार केलेले गुलाब. वेगवेगळ्या रंगातील गुलाब तुम्ही व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार शकता.

View post on Instagram
 

VIDEO : लाल रंगातील क्राफ्ट पेपर घेऊन त्याची लहान-लहान सुंदर गुलाब तयार करू शकता. गुलांबाचा गुच्छ तयार करण्यासाठी तुम्ही खालील व्हिडीओ नक्की पाहा.

View post on Instagram
 

VIDEO : लाल रंगातील सॅटिन पट्टीचा वापर करून व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या सर्वप्रथम तयार करून घ्या. त्यानंतर व्हिडीओ पाहून तुम्ही हवी तेवढी गुलाबाची फुल तयार करू शकता.

View post on Instagram
 

Photo : तुम्हाला चित्रकलेची आवड असल्यास पार्टनरला गुलाबाच्या फुलांचे सोपे असे पेटिंग तयार करून देऊ शकता. 

View post on Instagram
 

व्हॅलेंनटाइन डे वीक कॅलेण्डर

  • 7 फेब्रुवारी : रोझ डे
  • 8 फेब्रुवारी : प्रपोज डे
  • 9 फेब्रुवारी : चॉकलेट डे
  • 10 फेब्रुवारी : टेडी डे
  • 11 फेब्रुवारी : प्रॉमिस डे
  • 12 फेब्रुवारी : हग डे
  • 13 फेब्रुवारी : किस डे
  • 14 फेब्रुवारी : व्हॅलेंनटाइन डे

आणखी वाचा : 

Valentine Week 2024 : 'रोझ डे' निमित्त जाणून घ्या बादशाह जहांगीर आणि नूरजहाँ बेगम यांच्या सदाबहार प्रेमाचा किस्सा

'लाल इश्क', Valentine Day साठी परफेक्ट आहेत हे Dress

Rose Day 2024: रोझ डेच्या निमित्ताने तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला पाठवा खास मेसेज