Valentine Week 2024 : 'रोझ डे' निमित्त जाणून घ्या बादशाह जहांगीर आणि नूरजहाँ बेगम यांच्या सदाबहार प्रेमाचा किस्सा

| Published : Feb 06 2024, 04:39 PM IST / Updated: Feb 06 2024, 04:51 PM IST

Rose Day 2024
Valentine Week 2024 : 'रोझ डे' निमित्त जाणून घ्या बादशाह जहांगीर आणि नूरजहाँ बेगम यांच्या सदाबहार प्रेमाचा किस्सा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या फ्रेबुवारीतील 'व्हॅलेंनटाइन वीक' ला 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. उद्या 'रोझ डे' साजरा केला जाणार आहे.

Rose Day 2024 :  प्रेमाचा रंग लाल असणाऱ्या 'व्हॅलेंनटाइन डे' महिन्याची सुरुवात झाली आहे. पण उद्यापासून 'व्हॅलेंनटाइन वीक' सुरू होणार आहे. उद्या (7 फेब्रुवारी) ‘व्हॅलेंनटाइन वीक’ मधील पहिला दिवस म्हणजेच 'रोझ डे' साजरा केला जाणार आहे. यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये आजपासूनच गुलाबांची खरेदी-विक्री वाढली गेल्याचे दिसून येईल. पण तुम्ही कधी विचार केलाय, 'व्हॅलेंनटाइन डे' वीक ची सुरुवात नेहमीच 'रोझ डे' पासूनच का होतो?

प्रेमाचे प्रतीक ‘लाल गुलाब’
लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. बहुतांश जणांना लाल गुलाब फार आवडते. याशिवाय मनातील भावना आवडत्या व्यक्तीसमोर मांडताना लाल गुलाबाचे फुल देऊन त्याला आपल्या आणि फुलाच्या मोहात पाडले जाते. याच कारणास्तव 'व्हॅलेंनटाइन वीक' मधील 'रोझ डे' खास आहे.

View post on Instagram
 

बादशाह जहांगीर-नूरजहां यांच्या सदाबहार प्रेमाचा किस्सा
बादशाह जहांगीर आपल्या नूरजहाँ बेगम खूप प्रेम करायचे. जहांगीर प्रत्येकवेळी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरायचा. असे सांगितले जाते की, बादशाह जहांगीर आपली पत्नी नूरजहाँ बेगमला दररोज एक टन गुलाबाची फुल पाठवायचा. या दोघांची लव्ह स्टोरी आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत फॉलो करत पार्टनरला 'रोझ डे' निमित्त लाल गुलाब देण्याचा पायंडा पडला असावा.

आणखी वाचा : 

Rose Day 2024: रोझ डेच्या निमित्ताने तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला पाठवा खास मेसेज

Happy Propose Day Wishes in Marathi: या रोमँटिक शुभेच्छांसह ‘प्रपोज डे’ करा साजरा

'लाल इश्क', Valentine Day साठी परफेक्ट आहेत हे Dress