Kitchen Tips : तव्याला चपाती चिकटते? परफेक्ट पोळ्यांसाठी ट्राय करा या सोप्या टिप्स
रोजच्या स्वयंपाकात तव्याला चपाती चिकटणे ही एक डोकेदुखी असते. पण काही सोप्या किचन टिप्स वापरून तुम्ही चपाती चिकटणे आणि करपणे टाळू शकता आणि नेहमी एकदम परफेक्ट मऊ पोळ्या बनवू शकता.
सोपा घरगुती उपाय
सोपा घरगुती उपाय
रोजच्या स्वयंपाकात अनेक गृहिणींना एक कॉमन प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे लाटलेली चपाती किंवा पोळी तव्यावर टाकली की ती तव्याला चिकटते. यामुळे चपाती तर करपतेच, शिवाय तिची चवही बिघडते आणि तवा घासणे एक मोठी डोकेदुखी होऊन बसते. या समस्येवर एक अतिशय सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.
सहसा जुन्या तव्यांवर किंवा नवीन नॉन-स्टिक तव्याचे कोटिंग खराब झाल्यावर हा त्रास जास्त होतो. हा त्रास दूर करण्यासाठी आणि कापसासारख्या मऊ पोळ्या मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

मीठ आणि तेलाचा वापर
मीठ आणि तेलाचा वापर
सगळ्यात आधी तुमचा तवा गॅसवर ठेवा आणि चांगला गरम करा. त्यानंतर त्यावर एक चमचा मीठ आणि खाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. आता एका सुक्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने मीठ आणि तेल तव्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर साधारण एक मिनिटभर चांगलं चोळून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि तवा थंड होऊ द्या. मग साध्या पाण्याने धुवून, पुसून पुन्हा वापरा. या प्रक्रियेमुळे तव्यावरील बारीक छिद्रे बंद होतात आणि पृष्ठभाग गुळगुळीत होतो.
कांद्याची ट्रिक
कांद्याची ट्रिक
मीठ-तेल लावल्यानंतर आणि पहिली चपाती टाकण्यापूर्वी, अर्धा कांदा घ्या आणि तो तव्यावर हलक्या हाताने घासा. यामुळे तव्याला नैसर्गिक नॉन-स्टिक कोटिंग मिळते आणि चपात्या सहज सुटतात.
कणीक मळताना घ्या काळजी
कणीक मळताना घ्या काळजी
चपातीसाठी कणीक मळताना ती खूप कडक किंवा खूप पातळ नसावी. योग्य प्रमाणात मळलेली कणीक तव्याला चिकटत नाही. कणीक मळण्यासाठी थोडे कोमट पाणी वापरल्यास चपात्या अधिक मऊ होतात.
नॉन-स्टिक तव्याची काळजी
नॉन-स्टिक तव्याची काळजी
तुम्ही जर नॉन-स्टिक तवा वापरत असाल, तर त्यावर चाकू किंवा धातूचा उलथना वापरू नका. यामुळे कोटिंग खराब होईल आणि कणीक चिकटू लागेल.
या सोप्या टिप्स वापरून तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय सहजपणे चविष्ट आणि मऊ चपात्या बनवू शकता.
