सार

गुढीपाडव्यापासून हिंदू नवं वर्षाला सुरुवात होते. अशातच यंदा गुढीपावडव्याचा सण येत्या 30 मार्चला साजरा केला जाणार आहे. यंदा पहिल्यांदाचा गुढीपाडव्याचा सण साजरा करणार असाल तर गुढी कशी उभारायची हे जाणून घेऊया. याशिवाय गुढी उभारणीसाठीचे साहित्यही पाहूया.

How to rise gudi on Gudi Padwa 2025 : प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून हिंदू नवं वर्षाला सुरुवात होते. गुढीपाडव्याचा सण देभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. खासकरुन महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह पाहण्याजोगा असतो.

गुढीपाडवा 2025 तारीख आणि शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेची तिथी 29 मार्चला संध्याकाळी 4.27 वाजल्यापासून ते 30 मार्चला दुपारी 12.49 मिनिटांपर्यंत असणार आहे. अशातच गुढीपाडवा 30 मार्चला साजरा केला जाणार आहे.

गुढीपाडवा शुभ योग

यंदाच्या गुढीपाडव्यावेळी इंद्र योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. या दिवशी इंद्र योग संध्याकाळी 5.54 वाजेपर्यंत राहणार आहे. तर सर्वार्थ सिद्धि योग संध्याकाळी 4.35 मिनिटांनी सुरू होऊन 31 मार्च सकाळी 6.12 वाजेपर्यंत असणार आहे.

असा करा साजरा

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करा. यानंतर स्नान करा. या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर गोंड्याच्या फुलांचे तोरण लावले जाते. गुढी उभारली जाते.

गुढीसाठी साहित्य

गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासाठी उंच काढी, साडी किंवा ब्लाऊज पीस, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, तांब्याचा गडू, आंब्याची पाने, अष्टगंध, हळद-कुंकू, पाट

अशी उभारा गुढी

सर्वप्रथम गुढी उभारण्यासाठी काठी घ्या. याच्या वरच्या बाजूला साडी किंवा ब्लाऊज पीस लावा. यानंतर कडुलिंबाची पाने, अंब्याचे पाने, फुलांचा हार, साखरेच्या गाठी लावून घ्या. हे साहित्य काढीला बांधून घ्या. यावर तांब्याचा गडू उलट ठेवा. सजवलेल्या गुढीला अष्टगंधक, हळद-कुंकू लावून घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ असावी. गुढी उभारलेल्या ठिकाणी खाली पाट ठेवावा. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढा. गुढीची आरती करण्यासाठी ताटही तयार करा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)