GIVA च्या 2026 च्या नवीन इअररिंग कलेक्शनमध्ये फ्लोरल स्टड, हगी बाली आणि डँगलिंग चेनसारखे एकदम हटके डिझाइन्स आले आहेत.

आपल्या लुकमध्ये कपड्यांसोबतच ज्वेलरीचाही मोठा वाटा असतो. त्यातल्या त्यात कानातले तर खूप महत्त्वाचे. पण तेच ते सोन्याचे टॉप्स, झुमके घालून कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. GIVA ने 2026 साठी काही खास आणि ट्रेंडी इअररिंग्स आणले आहेत, जे तुमच्या प्रत्येक आऊटफिटवर मस्त दिसतील. जर तुम्हालाही सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल आणि एक क्लासी क्वीन म्हणून मिरवायचं असेल, तर हे डिझाइन्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

फ्लोरल टियरड्रॉप स्टड

GIVA च्या फेसबुक पेजवर असलेलं हे डिझाइन खूपच क्लासी आणि युनिक आहे. याला फुलाचा आकार दिलाय आणि मध्यभागी एक सॉलिटेअर खडा आहे. आठ पाकळ्यांमुळे याला एक नाजूक लूक मिळतो. हे तुम्ही कॅज्युअल वेअर, ऑफिस किंवा छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी सहज घालू शकता.

हेक्सागोनल क्लस्टर स्टड

चेहऱ्याला एक मॉडर्न आणि आकर्षक लूक देण्यासाठी हे षटकोनी (हेक्सागोनल) भूमितीच्या आकाराचे इअररिंग्स एक उत्तम पर्याय आहेत. यामध्ये पतंगाच्या आकाराचे अनेक खडे एकत्र लावले आहेत. सोबतच, हलक्या लायनिंगची डिटेलिंग याचा लूक पूर्ण करते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार हे 9 कॅरेट ते 22 कॅरेट सोन्यात बनवून घेऊ शकता. स्टायलिंगबद्दल बोलायचं झाल्यास, हे मॉडर्न आणि इंडो-वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर छान दिसतील.

हे पण वाचा- मुलीसाठी हवंय वेगळं नाव? 'ख' अक्षरावरून पाहा ४० युनिक आणि मॉडर्न नावं

रोज गोल्ड हगी बाली

रोजच्या डिझाइनपेक्षा काहीतरी वेगळं आणि युनिक हवं असेल, तर रोज गोल्ड फ्लोरल हगी हूप्स (बाली) तुमच्यासाठी बेस्ट आहे. याला एक स्मूथ हूप लॉक आहे, जो कानाजवळ सहज लॉक होतो. सोबतच, खाली लटकणारं एक छोटंसं फूल खूपच सुंदर दिसतं. हे पूर्णपणे प्लेटिंग बेस्ड मटेरियलवर बनवलेलं आहे. सॉफ्ट आणि फेमिनिन लूकसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

हे पण वाचा- तुमची बाग १२ महिने फुलांनी बहरलेली राहील! लावा ही झाडं, वर्षभर मिळतील रंगीबेरंगी फुलं

स्टड विथ डँगलिंग चेन

हे हटके दिसणारे इअररिंग्स खूपच मॉडर्न आहेत. यात वरच्या बाजूला चार पाकळ्यांचं एक सुंदर फूल आहे. मध्यभागी लावलेले मार्कीज कट स्टोन (खडे) खूपच आकर्षक दिसतात. या फुलाच्या दोन्ही टोकांना एक बारीक रोज गोल्ड चेन जोडलेली आहे. स्क्रू बॅक क्लोजरमुळे हे कानात व्यवस्थित बसतात आणि लूक पूर्ण करतात.

सुई धागा स्टाईल हूप स्टड

याचा आकार खूपच खास आहे. हे वक्र पानासारख्या किंवा लाटेसारख्या पॅटर्नमध्ये आहे, जे कानाच्या खाली एका सुंदर छोट्या फुलावर संपतं. या वक्र पट्टीवर एका ओळीत छोटे-छोटे खडे लावलेले आहेत. याला पुश बॅक क्लोजर आहे, ज्यामुळे स्टाईल आणि मजबुती दोन्ही मिळते.