नातेसंबंधांपेक्षाही अधिक महत्वाची वाटणारी Friendship, हे आहेत 5 मोठे फायदे
Frindship Day 2024 : प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी आयुष्यातील अत्यंत लाखमोलाच्या मित्रांना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. पण मैत्री आयुष्यात का महत्वाची असते याबद्दल जाणून घेऊया...
| Published : Aug 04 2024, 08:31 AM IST
- FB
- TW
- Linkdin
मानसिक आरोग्य सुधारते
मानसिक आरोग्य संतुलित राहण्यामागे मैत्रीचा फार मोठा वाटा असतो. ज्यावेळी मित्रमैत्रीणींसोबत उत्तम वेळ घालवता तेव्हा व्यक्तीला स्वत:मधील तणाव आणि चिंता दूर झाल्यासारखे वाटते. याशिवाय सच्चा मित्र नेहमीच तुम्हाला पाठिंबा देत असल्यानेही त्याच्यासोबत मनमोकळेपणाने मनातील भावना तुम्ही व्यक्त करता. यामुळे मन हलके होण्यासह मानसिक तणाव दूर होतो.
सोशल सपोर्ट
मैत्रीचा आणखी एक मोठा फायदा असा होतो की, व्यक्तीला मजबूत सोशल सपोर्ट मिळतो. आयुष्यातील कठीण काळात सच्चे मित्रच तुमच्यासोबत उभे राहतात. परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन करतात. मित्रांच्याच पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढत कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे बळ तुमच्यामध्ये वाढले जाते.
शारिरीक आरोग्य सुधारते
मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर शारिरीक आरोग्यास सुधारण्यासाठीही मैत्री मदत करतो. काही संशोधनातून समोर आले आहे की, ज्या व्यक्तींचे सच्चे मित्र असतात ते आयुष्यात हेल्दी राहण्यासह दीर्घायुष्य जगतात. मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जाणे, त्यांच्यासोबत उत्तम वेळ घालवणे, मनातील भावना मोकळेपणाने सांगणे अशा सर्व गोष्टींचा शारिरीक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे व्यक्तीला तणावाखाली असल्याचे जाणवत नाही.
आयुष्याबद्दलचा सकारात्मक विचार
मैत्री आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यातील आनंदाचा मुख्य स्रोत परिवारासह मैत्रीही आहे. मित्रमैत्रीणींसोबत वेळ घालवताना जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळणेपणाने हसता येते. याशिवाय मैत्री आयुष्याबद्दलचा सकारात्मक विचार करण्यास भाग पाडते. हाच सकारात्मक विचार आयुष्यातील कठीण काळातही फार महत्वाचा ठरतो.
आत्मविश्वास वाढला जातो
आयुष्यातील लाखमोलाचे मित्र नेहमीच देवदूतासारखे असतात. ते आपल्याला वाईट आणि चांगल्या गुणांसह स्विकार करतात. यामुळे व्यक्तीमधील आत्मविश्वास नेहमीच वाढलेला दिसतो. हाच आत्मविश्वास व्यक्तीला खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या मार्गावर घेऊन जातो.
आणखी वाचा :
Friendship Day 2024 निमित्त मनातील भावना व्यक्त करणारे खास मेसेज
Breastfeeding संबंधित हे 6 गैरसमज प्रत्येक महिलेला माहिती असावेत