प्रत्येक महिला आई झाल्यानंतर तिच्या बाळाला स्तनपान करते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. यामुळे बाळासह आईलाही याचा फायदा होतो.
ब्रेस्टफीडिंगसंदर्भात आजही काही घरांमध्ये वेगवेगळे सल्ले दिले जातात. जाणून घेऊया स्तनपानाबद्दलचे काही गैरसमज सविस्तर...
आई आजारी असल्यास बाळाला स्तनपान केल्याने तो देखील आजारी पडू शकतो असा गैरसमज आहे. खरंतर, सर्दी-खोकल्यातही आई आपल्या बाळाला दूध पाजू शकते.
बहुतांश घरांमधील महिलांना झोपून बाळाला स्तनपान करावे असे सांगितले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. बाळाला स्तनपान करताना त्याच्या डोक्याखाली हात ठेवण्यासह मांडीवर घेऊन दूध पाजावे.
स्तनपान करताना स्तन दुखणे सामान्य बाब आहे. पण स्तनपान करतेवेळी स्तनांमध्ये अधिक वेदना होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच स्तनपान करू नये असे काहीजण म्हणतात. खरंतर, हा एक गैरसमज असून जन्मानंतर बाळाला स्तनपान करणे फायदेशीर ठरते.
बहुतांशजण असा विचार करतात, स्तनपान केल्याने स्तनांवर परिणाम होते. खरंतर, यामागे काही कारणे असू शकतात.