Lip Care Tips: काळवंडलेल्या ओठांमुळे बिघडतंय तुमचे सौंदर्य? करा हे नैसर्गिक उपाय
Lip Care: तुमचे ओठ काळे पडलेत का? गुलाबी ओठांसाठी उपाय शोधत असल्यास पुढील घरगुती उपाय नक्कीच कामी येऊ शकतात.
| Published : Nov 28 2023, 02:44 PM IST / Updated: Nov 28 2023, 05:05 PM IST
- FB
- TW
- Linkdin
काळ्या पडलेल्या ओठांसाठी घरगुती उपाय
Lip Care Natural Remedies : सुंदर डोळे व गुलाबी ओठांमुळे सौंदर्यामध्ये अधिक भर पडते. पण काही जण काळ्या ओठांच्या समस्येमुळे त्रस्त असतात. ओठ नैसर्गिक स्वरुपात गुलाबी दिसावेत, यासाठी महिला तसेच पुरुषही कित्येक उपाय करतात. दुसरीकडे ओठ काळे होण्यामागील कारणे अनेक असू शकतात. उदाहरणार्थ, चहा-कॉफीचे अति प्रमाणात सेवन करणे, शरीरातील रक्ताची कमतरता, पोषणतत्त्वांचा अभाव इत्यादी.
या व्यतिरिक्त शरीरातील मेलेनिन या रंगद्रव्याच्या अति स्त्रावामुळेही त्वचा काळी पडण्याची समस्या निर्माण होते. याचा परिणाम ओठांच्या त्वचेवरही पाहायला मिळतो. पण आहारातील काही ठराविक बदल तसेच ब्युटी रूटीन योग्य पद्धतीने फॉलो केल्यास काळ्या पडलेल्या ओठांची समस्या कमी होऊन त्यास नैसर्गिक गुलाबी रंग मिळू शकतो. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
काळवंडलेल्या ओठांवर शोधताय उपाय?
- ओठ काळे पडण्यामागील कारण म्हणजे ओठांच्या त्वचेची योग्य पद्धतीने काळजी न घेणे. यामुळे पिगमेंटेशनची समस्या निर्माण होऊ शकते.
- तज्ज्ञांचा सल्ला न घेता केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा अति प्रमाणात वापर करणे.
- केमिकलयुक्त लिपस्टिकचा अति प्रमाणात वापर करणे
- ओठांवरून वारंवार जीभ फिरवणे.
काळ्या पडलेल्या ओठांसाठी घरच्या घरीच नैसर्गिक उपचार कसे करू शकतो, ही माहिती जाणून घेऊया.
मध आणि साखर स्क्रब
काळ्या पडलेल्या ओठांसाठी मध हे अतिशय उपयुक्त आहे. मधाचा लिप बामप्रमाणे वापर करता येतो. मधामध्ये अँटी-बॅक्टेरिया गुणधर्म आढळतात. यामुळे कोरड्या व फाटलेल्या ओठांसाठी मध वापरल्यास फायदेशीर ठरेल. दुसरीकडे साखरेमध्ये ग्लुकोज असते. तज्ज्ञमंडळीही स्क्रब म्हणून साखरेचा वापर करण्याचा सल्ला देतात. कारण साखरेमध्ये अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड असते, जे एक्सफोलिएटर प्रमाणे त्वचेवर काम करते व मृत पेशींची समस्या कमी करते.
काळ्या पडलेल्या ओठांसाठी एक्सफोलिएट
- काळ्या पडलेल्या ओठांसाठी घरच्या घरी एक्सफोलिएटर तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये बारीक साखर आणि मध एकत्रित घ्या.
- दोन्ही सामग्री व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करा.
- तयार झालेली पेस्ट हलक्या बोटांनी ओठांवर लावा.
- थोडावेळ ही पेस्ट तशीच ओठांवर ठेवावी व 15 मिनिटांनंतर ओठ थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
हा उपाय नियमित केल्यास हळूहळू तुमच्या ओठांवरील पिगमेंटेशन कमी होऊन ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होतील. हा उपाय अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निबांळकर हिने शेअर केलेल्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओत सांगितला आहे.
VIDEO: काळ्या ओठांच्या एक्सफोलिएशनसाठी पुढील व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा….
बदामाचे तेल आणि मध
काळ्या पडलेल्या ओठांसाठी बदामाचे तेल आणि मध एकत्रित करून लावू शकता. मधातील अँटी-बॅक्टेरिया गुणधर्मामुळे तसेच बदामाच्या तेलामुळे ओठांची त्वचा मऊ होण्यास मदत मिळू शकते. याशिवाय बदामाच्या तेलामध्ये ओमेगा-6 फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग (Kalya Othansathi Gharguti Upay) प्राप्त होण्यास मदत मिळू शकते.
कोरफडीचा गर
कोरफडीचा गर काळ्या पडलेल्या ओठांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे नैसर्गिकरित्या ओठ गुलाबी होऊ शकतात. कोरफडीच्या गरामध्ये ऑक्सिजनसह इंफ्लेमेंटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे ओठांवरील मृत पेशींची समस्या कमी होण्यास मदत मिळते. हा उपाय करण्यासाठी बाजारातील कोरफडीचे जेल वापरण्याऐवजी घरामध्ये कोरफडीचे रोप लावा व त्याचा वापर करावा.
आणखी वाचा:
Fashion Tips: पेस्टल आउटफिट्सवर स्टायलिश लुकसाठी अशी निवडा ज्वेलरी
पोटावर वाढलेली चरबी कमी करायचीय? मग करा हे सोपे व्यायाम
Beauty Tips : महागडे प्रोडक्ट वापरूनही मेकअप लुक परफेक्ट दिसत नाही? मग तुम्ही करताय या गंभीर चुका
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.