सार

DIY Tips: तुमच्याकडे देखली जुना टॉवेल आहे? फेकण्याचा विचार करत असल्यास थांबा. कारण जुन्या टॉवेलपासून विविध क्रिएटिव्ह वस्तू तयार करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

 

Old Towel Reuse:  घरातील काही गोष्टींचा एकदा वापरल्यानंतर फेकून दिल्या जातात. बहुतांशजणांना कळत नाही, जुन्या वस्तूंचा वापर पुन्हा  कोणत्या पद्धतीने करावा? त्यापैकीच एक म्हणजे टॉवेल. टॉवेल जुना झाल्यानंतर तो फेकून देता का? पण जुन्या टॉवेलचा विविध पद्धतीने वापर करता येतो.

जुन्या टॉवेलपासून बॅग ते मुलांची खेळणी ठेवण्यासाठी पिशवी तयार करू शकता. जुन्या टॉवेलचा पुन्हा वापर करण्यासाठी खास टिप्स पाहुया…

टॉवेलपासून स्टायलिश बॅग कशी तयार करावी?

  • जुना टॉवेल
  • शिलाई मशीन
  • बॅगेसाठी लागणारी चैन
  • कात्री

 पुढील स्टेप्स फॉलो करा 

  • बॅग बनवण्यासाठी सर्वात प्रथम जुना टॉवेल स्वच्छ धुवा
  • तुम्हाला हवे असलेल्या डिझाइनच्या आकारात टॉवेल कट केल्यानंतर शिलाई करून घ्यावी
  • आतील बाजूने फॅब्रिक शीट जोडावे
  • दुसऱ्या बाजूने देखील शिलाई करून घ्या
  • तुम्हाला हवे असल्यास बॅगला चैन लावू शकता
  • बॅगचा लूक अधिक खुलून दिसण्यासाठी त्यावर एखादे स्टायलिश एलिमेंट आपण जोडू शकता

 

VIDEO: टॉवेलपासून बॅग तयार करण्यासाठी संपूर्ण पहा व्हिडीओ

View post on Instagram
 

पायपुसणे

घराबाहेरून आल्यानंतर बाहेरची माती- घाण घरात येऊ नये म्हणून दरवाज्याबाहेर आपण पायपुसणे ठेवतो. जुन्या टॉवेलचे पायपुसणे तयार करू शकता. बाजारातून पायपुसणे खरेदी करण्याऐवजी घरच्या घरी जुन्या टॉवेलचे पायपुसणे तयार करू शकता.

धूळ स्वच्छ करण्यासाठी वापरा

बुटांचे रॅक अथवा कपटावर ठेवल्या जाणाऱ्या कापडाप्रमाणे जुन्या टॉवेलचा वापर करू शकता. यासाठी अधिक खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला हव्या असलेल्या आकारात टॉवेल कापून वापरू शकता.

घराची स्वच्छता करण्यासाठी वापरा

जुन्या टॉवेलच्या मदतीने घराची स्वच्छता करू शकता. टॉवेल आकाराने जाड असल्याने घराची उत्तम स्वच्छता होऊ शकते. किचनमधील कपाट, धूळ लागलेल्या खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी देखील जुन्या टॉवेलचा वापर करू शकता.

जुन्या टॉवेलपासून या गोष्टीही तयार करू शकता

  • टेबल क्लॉथ तयार करू शकता
  • उशीचे कव्हर
  • मुलांची खेळणी ठेवण्यासाठी बॅग
  • शोपिस 
  • लहान मुलांची खेळणी

आणखी वाचा: 

चांदीच्या ग्लासातून प्या पाणी, आरोग्यास मिळतील इतके अद्भुत लाभ

आंघोळीच्या कोमट पाण्यात मिक्स करा एक चमचा तूप, मिळतील हे फायदे

महिनाभर अंडी टिकवून ठेवायची आहेत? जाणून घ्या सोप्या टिप्स