Fashion Tips: बोल्ड, ब्युटीफुल लुकसाठी Tube Top असा करा स्टाइल

| Published : Dec 07 2023, 11:34 AM IST

Tube Top

सार

Styling Tips: प्रत्येक महिलेला स्टाइलिश दिसायचे असते. यासाठी त्या वेळोवेळी नवा ट्रेण्डदेखील फॉलो करतात.अशातच सध्या ट्युब टॉपचा ट्रेण्ड आहे. पण ट्युब टॉप वेगवेगळ्या पद्धतीने कसे स्टाइल करू शकता हे माहितेय का? जाणून घेऊया याबद्दल अधिक...

Tube Top Styling: आजकाल मार्केटमध्ये सातत्याने फॅशनचा ट्रेण्ड बदलत राहतो. यामुळे बहुतांश महिला, तरूणी नवा ट्रेण्ड फॉलो करणे पसंत करतात. सध्या मार्केटमध्ये तुम्हाला टॉपचे काही प्रकार पाहायला मिळतील. पण ते योग्य पद्धतीने स्टाइल केल्यास तुमचा लुक अधिक खुलला जाईल. यापैकीच एक म्हणजे ट्यूब टॉप. कॉलेजला जाणाऱ्या तरूणींमध्ये ट्यूब टॉपची क्रेझ अधिक असते. तुम्ही ट्यूब टॉप वेस्टर्न ते इंडियन लुकसाठी देखील परिधान करू शकता. ट्यूब टॉप वेगवेगळ्या पद्धतीने कसा स्टाइल करता येईल हेच जाणून घेऊया....

ट्यूब टॉप विद जॅकेट
ब्लोड लुकसाठी तुम्ही ट्यूब टॉप परिधान करू शकता. पण शरीराच्या आकारानुसार ट्यूब टॉपमध्ये सुंदर आणि परफेक्ट लुकसाठी यासोबत जॅकेट पेयर करू शकता.ट्यूब टॉप विद जॅकेटमुळे तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक मिळेल.

ट्यूब टॉप विद शॉट्स
ट्यूब टॉप विद शॉट्समुळे तुमचा लुक एक्स्ट्रॉ ग्लॅमरस दिसेल. याचे कॉम्बिनेशन अत्यंत सुंदर दिसते. बहुतांश सेलिब्रेटींनाही ट्यूब टॉप विद शॉट्समध्ये तुम्ही पाहिले असेल. ट्यूब टॉप विद शॉट्समधील हा लुक तुम्ही देखील ट्राय करू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला ट्यूब टॉपचे वेगवेगळे डिझाइन्स मिळतील जे शॉट्सवर छान दिसतात.

ट्यूब टॉप विद पँट
ट्यूब टॉप कोणत्याही पँटसोबत परिधान करू शकता. ट्यूब टॉप विद पँट असणारा को-ऑर्ड सेटदेखील छान दिसतो. खरंतर सध्या को-ऑर्ड सेटचा ट्रेण्ड असून यामध्ये तुम्ही कूल दिसता.

ट्यूब टॉप विथ साडी
आजकाल बहुतांश महिला साडीला वेस्टर्न टच देण्याचा प्रयत्न करतात. साडीसोबत तुम्ही ट्यूब टॉप ब्लाउजप्रमाणे परिधान करू शकता. यामुळे तुमचा लुक ग्लॅमरस दिसतो. ट्यूब टॉपमध्ये कंम्फर्टेबल नसल्यास एखादे शॉर्ट जॅकेट पेयर करू शकता. यामुळे तुमचा लुक हटके दिसून येईल. ट्यूब टॉप हे नेट फॅब्रिक असणाऱ्या साडीसोबत सुंदर दिसतात.

ट्यूब टॉप विद शरारा
शरारा सध्या पुन्हा ट्रेण्डमध्ये आहे. ट्यूब टॉप तुम्ही कोणत्याही फॅब्रिक कपड्यांसोबत परिधान करू शकता. याशिवाय श्रग देखील ट्यूब टॉपवर छान दिसतात. ट्यूब टॉप विद शरारा तुम्ही एखाद्या पार्टी, फंक्शनवेळी परिधान करू शकता.

ट्यूब टॉप विद स्कर्ट
एखाद्या कॉकटेल पार्टीसाठी ट्यूब टॉप विद स्कर्टचा पर्याय बेस्ट आहे. यामुळे तुम्ही बोल्ड आणि ब्युटीफुल दिसाल. या आउटफिट्ससोबत केस मोकळे किंवा कर्ल्स करू शकता.

आणखी वाचा: 

DRY CLEANचा खर्च टाळायचाय? घरच्या घरी असा स्वच्छ धुवा ओव्हरकोट

लग्नसोहळ्यात रॉयल लुक हवाय? काश्मिरी व्हेलवेट डिझाइनचे सूट करा ट्राय

Fashion Tips: मैत्रिणींनो हायटेड दिसायचंय? ट्राय करा असे कुर्ते, लोक म्हणतील Just Looking A Wow