तुमच्या आधार कार्डवर किती SIM Card रजिस्टर आहेत हे कसे ओळखाल? वापरा या सोप्या ट्रिक

| Published : Jan 03 2024, 11:05 AM IST / Updated: Jan 03 2024, 12:05 PM IST

Aadhaar card

सार

आधार कार्डचा वापर सध्या बँक खाते सुरू करणे ते शासकीय कामांसाठी केला जातो. पण तुम्ही नवे सिम कार्ड खरेदी करताना तुमचे आधार कार्ड ओखळपत्र म्हणून दाखवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Aadhaar Card Use for SIM Card : स्मार्टफोनच्या माध्यमातून फोन किंवा पेमेंट करण्यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी भारतीय टेलिकॉम कंपन्यांच्या (Indian Telecom Company) सिम कार्डचा आपण वापर करतो. पण सिम खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचे ओखळपत्र दाखवावे लागते.

नवे सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर करणे सर्वसामान्य बाब आहे. काहीवेळेस एका युजरला स्वत:साठी एकापेक्षा अधिक सिम कार्डची गरज असते.

खरंतर एका आधार कार्डवर एकापेक्षा अधिक सिम कार्ड खरेदी करता येऊ शकतात. पण डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या (Department Of Telecommunication) नियमावलीनुसार, एका आधार कार्डवर केवळ नऊ सिम कार्डचा वापर करता येऊ शकतो. पण तुम्हाला माहितेय का, तुमच्या आधार कार्डवर दुसरा एखादा व्यक्ती देखील सिम कार्ड वापरू शकतो? 

फसवणूकीच्या स्थितीत डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचे नवे पोर्टल तुमची मदत करू शकते. म्हणजेच तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून पाहू शकता. यासाठीची सोपी ट्रिक स्टेप बाय स्टेप पाहूया....

तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे पुढील ट्रिकने ओखळू शकता-

 • सर्वप्रथम टेलिकम्युनिकेशनची वेबसाइट tafcop.sancharsaathi.gov.in येथे भेट द्या
 • या वेबसाइटवर तुम्हाला 'टेलिकॉम युजर'च्या सेक्शनमध्ये 'आधार कार्डला लिंक असलेला मोबाइल क्रमांक' असा पर्याय दाखवला जाईल
 • आता या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म दिसेल त्यामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड (Captcha Code) भरावा लागेल
 • फॉर्म भरल्यानंतर 'Submit' पर्यायावर क्लिक करा
 • काही वेळानंतर तुम्हाला एक पेज दिसेल, त्यामध्ये तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत याची यादी दाखवली जाईल

UIDAI ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून असे तपासा-

 • सर्वप्रथम UIDAIची अधिकृत वेबसाइट uidai.gov.inला भेट द्या
 • वेबसाइटवर My Aadhaar सेक्शनवर क्लिक करा
 • आता तुम्हाला डाउनलोड आधार पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर View More पर्यायावर क्लिक करा
 • आधार सर्विसच्या अंतर्गत Mobile Number Authentication Historyचा पर्याय निवडा
 • आता Aadhaar Authentication History येथे क्लिक करा
 • तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून Request OTPवर क्लिक करा
 • तुमच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो भरा
 • लॉगइन यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला View Mobile Numbers Linked with your Aadhaar पर्याय पाहू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डवर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे दिसेल.

आणखी वाचा: 

एक चूक आणि 71 लाख WhatsApp अकाउंट बंद? जाणून घ्या काय आहे प्रकरण

ITR फायलिंग ते सिमकार्ड खरेदी, या 7 गोष्टींमध्ये आजपासून मोठे बदल

वास्तुशास्त्रानुसार नववर्षात लावा ही 5 रोप, पालटेल नशीब