Lifestyle

Technology

एक चूक आणि 71 लाख WhatsApp अकाउंट बंद? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Image credits: Freepik

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर बंदी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने भारतात नोव्हेंबर, 2023 मध्ये 71 लाखांहून अधिक युजर्सचे अकाउंट बंद केले. ही कार्यवाही आयटी नियम 2021चे पालन न केल्याने करण्यात आली आहे. 

Image credits: freepik

आयटी नियम 2021

आयटी नियम 2021 नुसार सोशल मीडियातील सर्व बड्या कंपन्यांना प्रत्येक महिन्याला युजर सेफ्टी रिपोर्ट जारी करावा लागतो. यामध्ये तक्रारीसह करण्यात आलेल्या कार्यवाहीबद्दल सांगावे लागते. 

Image credits: freepik

किती अकाउंट्स केले बंद?

1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2023 दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील 71 लाख 96 हजार अकाउंट्स बंद केले. यापैकी 19 लाख 54 हजार अकाउंट तक्रारी निरीक्षणाअंतर्गत बंद केले आहेत.

Image credits: freepik

नोव्हेंबर 2023 मधील तक्रारी

नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपकडे 8 हजार 841 तक्रारी आल्या होत्या. अशातच प्रत्येक महिन्याला युजरने जर व्हॉट्सअ‍ॅपच्या नियम व अटींचे पालन न केल्यास त्याचे खाते बंद होऊ शकते.

Image credits: freepik

...अन्यथा होईल अकाउंट बंद

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर न्यूडिटी, फसवणूक, चोरी आणि देशाविरोधातील कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी असल्यास तुमचे अकाउंट बंद होऊ शकते.

Image credits: freepik

युजर्सची सुरक्षितता

व्हॉट्सअ‍ॅपने गेल्या वर्षात युजर्सची सुरक्षितता पाहून काही नवे फिचर्स लाँच केले होते. यामध्ये चॅट लॉक, ईमेल आयडी लिंक, Passkey सारख्या फिचर्सचा समावेश आहे.

Image credits: freepik

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटची सुरक्षितता

तुम्ही ईमेल आयडी व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला लिंक केले नसल्यास ते करून घ्या. यामुळे तुम्ही ईमेलच्या माध्यमातूनही व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटसाठी लॉगइन करू शकता. 

Image credits: freepik