सार
बहुतांशजणांची सकाळची सुरूवात ही वाफाळलेल्या चहाने होते. यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा प्यायल्याने मूड फ्रेश होतो असे काहींना वाटते. दररोज रेग्युलर चहा पिऊन कंटाळा असाल तर कॅरेमल टी ची रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
Caramel Tea Recipe : चहाप्रेमींसाठी चहा हा जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या चहा आपल्याला रेस्टॉरंट किंवा एखाद्या चहाच्या टपरीवर मिळतात. याशिवाय सध्या सोशल मीडियात चहा तयार करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण पाहतो. एवढेच काय घरी आलेल्या पाहुण्यांना चहा हमखास दिला जातो.
पण चहाची एखादी हटके रेसिपी तयार करून पाहुण्यांना कधी सर्व्ह केलीयं का? घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट तयार होणारी कॅरेमल टी पुढच्या वेळी नक्की ट्राय करून पाहा. जाणून घेऊया याची रेसिपी सविस्तर....
सामग्री
- चार मोठे चमचे साखर
- एक चतुर्थांश पाणी
- दोन चमचे चहा पावडर
- तीन चतुर्थांश दूध
- दालचिनीचा एक तुकडा
- व्हेनिला एसेंस
कृती
- कॅरेमल टी तयार करण्यासाठी सर्वप्रथम मंद आचेवर गॅस सुरू करा. आता चहाचे भांडे गॅसवर चढवून त्यामध्ये साखर टाका.
- साखर टाकल्यानंतर ती विरघळेपर्यंत चमच्याने सतत ढवळत रहा. जेणेकरून ती चहाच्या भांड्याला चिकटली जाणार नाही.
- साखर पूर्णपणे विरघळून त्याला तपकिरी रंग आल्यानंतर यामध्ये पाणी मिक्स करा. काही सेकंद हे मिश्रण व्यवस्थितीत एकजीव होऊ द्या.
- चहामध्ये दालचिनी, चहा पावडर मिक्स करून एक उकळ काढा. आता चहामध्ये दूध मिक्स करून पुन्हा एकदा उकळ काढा.
- तीन मिनिटांपर्यंत संपूर्ण चहा उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा. चहा तयार झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये व्हेनिला एसेंस मिक्स करा.
- कॅरेमल टी तयार करून झाल्यानंतर घरी आलेल्या पाहुण्यांना तो बिस्किटांसोबत सर्व्ह करा.
VIDEO : कॅरेमल टी ची सोपी रेसिपी पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा
Video Credits : SooperChef
VIDEO : ढाबा स्टाइल स्पेशल चहा रेसिपी
Video Credits : myfoodproject
आणखी वाचा:
Mock Chicken Tikka : विराट कोहलीने मॉक चिकन टिक्कावर मारला ताव, जाणून घ्या रेसिपी
Saat Kappyache Ghavane : सात कप्प्यांचे घावणे, जाणून घ्या कोकणातील पारंपरिक रेसिपी