Mock Chicken Tikka : विराट कोहलीने मॉक चिकन टिक्कावर मारला ताव, जाणून घ्या रेसिपी

| Published : Dec 15 2023, 01:07 PM IST / Updated: Dec 15 2023, 01:22 PM IST

virat kohali
Mock Chicken Tikka : विराट कोहलीने मॉक चिकन टिक्कावर मारला ताव, जाणून घ्या रेसिपी
Share this Article
 • FB
 • TW
 • Linkdin
 • Email

सार

Mock Chicken Tikka Recipe : विराट कोहलीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर ‘मॉक चिकन टिक्का’ या पदार्थाचा फोटो शेअर केला होता. पण हा पदार्थ शाकाहारी की मांसाहारी? यासंदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

Mock Chicken Tikka : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आपल्या डाएटची खूप काळजी घेतो. कारण मैदानात चांगली खेळी खेळायची असेल तर शारीरिक तसेच मानसिक आरोग्य निरोगी असणे फार गरजेचं आहे, हे त्याला माहिती आहे. फिट राहण्यासाठी कोणकोणते व्यायाम करतो तसेच डाएटबाबतची माहिती तो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. 

काही मुलाखतींमध्येही त्याने सेमी वेगन (semi-vegan) डाएट फॉलो करत असल्याची माहिती दिली होती. याचा अर्थ तो पूर्णपणे शाकाहारी असून वेगन डाएटमधील काही गोष्टी फॉलो करतोय.

नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचा फोटो शेअर केला होता. मॉक चिकन टिक्का ( Mock Chicken Tikka) असे या पदार्थाचे नाव आहे. हा फोटो शेअर करताचा विराटने पुन्हा मांसाहार करण्यास सुरुवात केली का? अशी चर्चा सुरू झाली. 

हा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. पण तुम्हाला माहिती आहे का? या डिशच्या नावामध्ये चिकनचा समावेश असला तरीही हा पदार्थ पूर्णपणे शाकाहारी आहे. हा पदार्थ टोफू किंवा फणस या फळापासून तयार केला जातो.

जाणून घेऊया Mock Chicken Tikka या पदार्थाची रेसिपी (Mock Chicken Tikka Recipe) 

सामग्री :

 • टोफू - एक ब्लॉक
 • दही किंवा किसलेले ओले खोबरे - एक कप
 • तेल - दोन मोठे चमचे
 • टोमॅटोची पेस्ट - एक मोठा चमचा
 • लिंबाचा रस - एक मोठा चमचा
 • जीरे पावडर - एक चमचा
 • धणे पावडर - एक चमचा
 • हळद - एक चमचा
 • स्मोक्ड पेपरिका - एक चमचा
 • गरम मसाला - एक चमचा
 • वाटलेले आले - एक चमचा
 • लसणाच्या दोन पाकळ्या
 • मीठ-काळी मिरी चवीनुसार

मॉक चिकन टिक्का रेसिपी

 • सर्वप्रथम टोफूतील अतिरिक्त पाणी काढून घ्या. यानंतर ते चौकोनी आकारात कापून घ्या.
 • एका मोठ्या भांड्यामध्ये मॅरिनेटसाठी लागणारी सर्व सामग्री एकत्रित करा. दही, तेल, टोमॅटो पेस्ट, जीरे, लिंबाचा रस, धणे, हळद, स्मोक्ड पेपरिका, गरम मसाला, वाटलेले आले, लसूण पेस्ट, मीठ आणि काळी मिरी सर्व सामग्री एकत्रित करा.
 • या मॅरिनेट सामग्रीमध्ये टोफूचे क्युब्स मिक्स करा. प्रत्येक क्युब योग्य पद्धतीने मॅरिनेट होईल याची काळजी घ्यावी. यानंतर दोन तासांसाठी मिश्रण तसेच ठेवा.  
 • मॅरिनेट केलेले टोफू मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये 20 - 25 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
 • तयार झालेले टोफू ओव्हनमधून बाहेर काढा व एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर कोथिंबरीने सजावट करावी आणि आवडत असल्यास लिंबाचा रसही मिक्स करावा.
 • गरमागरम मॉक चिकन टिक्काचा आवडत्या चटणीसोबत आस्वाद घ्यावा.

आणखी वाचा : 

Health Tips : सावधान! तुम्ही चुकीच्या वेळी पपई खाताय का?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करतात या छोट्याशा बिया? रीसर्चमधील मोठी माहिती

Hair Care : या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळताहेत तुमचे केस, टक्कल पडण्यापूर्वीच व्हा सावध