Alia Bhatt Beetroot Salad Recipe : आलिया भटची आवडती बीटरूट सॅलेड रेसिपी जाणून घ्या, वेटलॉससाठी रामबाण उपाय

| Published : Oct 12 2023, 06:26 PM IST / Updated: Oct 12 2023, 06:32 PM IST

chukander-raita
Alia Bhatt Beetroot Salad Recipe : आलिया भटची आवडती बीटरूट सॅलेड रेसिपी जाणून घ्या, वेटलॉससाठी रामबाण उपाय
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Alia Bhatt Beetroot Salad Recipe :काकडी-टोमॅटोचे सॅलेड आपण नक्कीच खाल्ले असेल. पण कधी बीटरूट सॅलेडची चव चाखलीय? नाही म्हणता. चला तर जाणून घेऊया रेसिपी…

 

Alia Bhatt Beetroot Salad Recipe : धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे हल्ली अनेकजण जंक फूड, फास्टफूड किंवा रेस्टॉरंटमधील चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसतात. पण मित्रांनो यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत, हे लक्षात घ्या.

याऐवजी आहारामध्ये सॅलेड, फळ-भाज्यांचा रस, पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. सकाळी-सकाळी नाश्ता तयार करणे शक्य नसेल तर सॅलेड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. काकडी-टोमॅटोचे सॅलेड आपण अनेकदा खाल्ले असेलच पण बीटरूटच्या सॅलेडचा आस्वाद घेतला आहे का? पण काहींना बीटरूटची चव आवडत नसल्याने ही मंडळी थेट आहारातूनच ते वर्ज्य करतात.

आरोग्यास पोषक असणारे बीटरूटमधील आरोग्यवर्धक घटक

पण यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. बीटरूटमध्ये (beetroot salad recipe health benefits) कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन B-6, व्हिटॅमिन C, रायबोफ्लेविन आणि थायमिन यासारखे व्हिटॅमिन देखील आहेत. 

कॅल्शिअम, लोह, सोडियम, पोटॅशियम, फास्फॉरस आणि मॅग्नेशियम यासारखी खनिजेही आहेत. तुम्हाला बीटरूट खाणे आवडत नसेल तर आपण याचे सॅलेड तयार करून खाऊ शकता. 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटला (Alia Bhatt) बीटरूट सॅलेड (alia bhatt beetroot salad with tadka recipe) खायला खूप आवडते आणि ही तिची आवडती रेसिपी (alia bhatt diet plan) आहे. चला तर जाणून घेऊया आलियाने शेअर केलेली बीटरूट सॅलेडची रेसिपी…

सामग्री

  • दोन बीटरूट - त्यावरील साल काढा व किसून घ्या
  • दही - 400 ग्रॅम
  • मीठ - चवीनुसार
  • काळे मीठ - चवीनुसार
  • जीरे पावडर - अर्धा चमचा
  • वाटलेली काळी मिरी - अर्धा चमचा
  • तेल - एक चमचा
  • कढीपत्ता - आवश्यकतेनुसार
  • मोहरी - अर्धा चमचा
  • बीटरूट सॅलेडची रेसिपी

सर्वप्रथम बीटरूट (alia bhatt beetroot salad recipe in marathi) स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढा. यानंतर किसून हलक्या स्वरुपात फ्राय करा व वाफवून घ्या. यामुळे बीटरूटमधील गोडवा कमी होतो. 

हवे असल्यास आपण यामध्ये थेट दही मिक्स करू शकता. किंवा दही आधी चांगले फेटून घ्या आणि त्यामध्ये किसलेले बीटरूट मिक्स करा. यामध्ये जीरे पावडर, काळी मिरी, मीठ मिक्स करा. सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करून घ्या.

यानंतर एक भांडे घ्या. त्यामध्ये थोडेसे तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी व कढीपत्ता टाकावा. मोहरी-कढीपत्ता पूर्णपणे तडकल्यानंतर सॅलेडच्या वरून तडका सोडावा. तयार आहे हेल्दी बीटरूट सॅलेड.

In Alia Bhatt's Kitchen ft. Dilip & Carol | Ep. 1 | Alia Bhatt

बीटरूटचे सॅलेड खाण्याचे फायदे

बीटरूटचे सॅलेड (alia bhatt beetroot salad benefits) आपण पोळी, भात, पराठ्यासह खाऊ शकता. गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असल्यास बीटरूटचे सॅलेड तयार करून खावे. या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केल्यास मधुमेह, कॅन्सर, हृदय रोग आणि उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.

तसंच शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते, हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. दही पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. शिवाय या पदार्थामुळे शरीराचे वजन (Weight Loss Tips In Marathi) देखील कमी होण्यास मदत मिळते. हिमोग्लोबिनची पातळी वाढून शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर होते.

आणखी वाचा :

Health Benefits Of Banana Leaf : केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे माहितीयेत? मिळतील इतके अद्भुत लाभ

Fashion Tips सावधान! तुम्हीही नवीन कपडे न धुताच परिधान करता? होतील हे गंभीर परिणाम

Bosu Ball Exercises : बोसू बॉल एक्सरसाइज माहितीये? जाणून घ्या सविस्तर माहिती

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.