MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Bread Samosa : पीठ मळायची झंझट विसरा, ब्रेडपासून बनवा कुरकुरीत समोसा!

Bread Samosa : पीठ मळायची झंझट विसरा, ब्रेडपासून बनवा कुरकुरीत समोसा!

समोसा बनवण्यासाठी आता पीठ मळण्याची गरज नाही! ब्रेडचे तुकडे आणि बटाट्याचा मसाला वापरून कुरकुरीत समोसा कसा बनवायचा ते पाहूया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Nov 05 2026, 10:03 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पीठ न मळता बनवा समोसा!
Image Credit : Asianet News

पीठ न मळता बनवा समोसा!

संध्याकाळी गरमागरम समोसा खाण्याची इच्छा होतेय का? त्यासाठी आता वेगळे पीठ मळून लाटण्याची गरज नाही. घरात असलेल्या ब्रेडच्या तुकड्यांपासून तुम्ही त्रिकोणी आकाराचे समोसे बनवू शकता. आतमध्ये मसालेदार बटाट्याचं सारण भरून ते तेलात तळून घ्या. हे समोसे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात. नेहमीच्या समोस्याला पर्याय म्हणून तुम्ही हा सोपा ब्रेड समोसा नक्की ट्राय करू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
लागणारे साहित्य!
Image Credit : Asianet News

लागणारे साहित्य!

हा ब्रेड समोसा बनवण्यासाठी ६ ते ८ ब्रेडचे स्लाइस, २ उकडलेले बटाटे, एक छोटा कांदा, १ हिरवी मिरची आणि थोडं आलं घ्या. सोबतच अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, थोडं जिरं, मीठ आणि कोथिंबीर लागेल. तुम्हाला आवडत असल्यास उकडलेले वाटाणेही घालू शकता. ब्रेडच्या कडा चिकटवण्यासाठी थोडं पाणी आणि समोसे तळण्यासाठी तेल घ्या.

Related Articles

Related image1
Homemade Ghee Recipe : दुधाच्या सायीपासून घरीच बनवा साजूक तूप, सोपी पद्धत
Related image2
7 Cup Burfi Recipe : तोंडात टाकताच विरघळेल, फक्त ७ साहित्यांत घरच्या घरी बनवा ही खास मिठाई
36
बटाट्याचा मसाला कसा बनवायचा?
Image Credit : Asianet News

बटाट्याचा मसाला कसा बनवायचा?

सर्वात आधी कढईत थोडं तेल गरम करून त्यात जिरं घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि आलं घालून परतून घ्या. कांदा परतल्यावर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ घाला. आता उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करा. आवडत असल्यास उकडलेले वाटाणे घाला. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा. मसाल्यात जास्त ओलसरपणा नसावा, नाहीतर ब्रेड लवकर फाटू शकतो. आता हा मसाला थंड होऊ द्या.

46
ब्रेडला समोस्याचा आकार कसा द्यायचा?
Image Credit : Asianet News

ब्रेडला समोस्याचा आकार कसा द्यायचा?

तुम्हाला हवे असल्यास ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यानंतर लाटण्याने हलक्या हाताने लाटून ब्रेड थोडा चपटा करा. एका ब्रेडचे दोन भाग करून प्रत्येक भागाला त्रिकोणी किंवा शंकूचा आकार द्या. कडांवर थोडं पाणी लावून त्या चिकटवून घ्या. आतमध्ये तयार केलेला बटाट्याचा मसाला भरा आणि उघडा भाग दाबून बंद करा. ब्रेड फाटू नये म्हणून जास्त पाणी लावू नका आणि मसालाही बेतानेच भरा.

56
कुरकुरीत कसे तळायचे?
Image Credit : Asianet News

कुरकुरीत कसे तळायचे?

कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. तयार केलेले ब्रेड समोसे हळूवारपणे तेलात सोडा. ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत आलटून-पालटून तळून घ्या. तेल जास्त गरम असेल तर समोसे बाहेरून लगेच लाल होतील पण नीट तळले जाणार नाहीत. तसेच तेल पुरेसे गरम नसेल तर ब्रेड जास्त तेल शोषून घेईल. त्यामुळे मध्यम आचेवरच समोसे काळजीपूर्वक तळा. तळलेले समोसे तेल निथळण्यासाठी टिशू पेपरवर काढा.

66
गरमागरम ब्रेड समोसा तयार!
Image Credit : Asianet News

गरमागरम ब्रेड समोसा तयार!

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार बटाट्याचं सारण असलेला ब्रेड समोसा गरमागरम सर्व्ह करा. तुम्ही हा समोसा पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता. ब्रेडमध्ये जास्त ओलसरपणा असेल तर समोसा फाटू शकतो, त्यामुळे मसाला पूर्णपणे थंड करून ब्रेड अलगद हाताळणे महत्त्वाचे आहे. नेहमीचे समोस्याचे पीठ मळण्याऐवजी घरातल्या ब्रेडपासून झटपट बनवता येणारा हा एक उत्तम स्नॅक आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Vastu Tips For Gold : घरात या दिशेला चुकूनही ठेवू नका सोनं, नाहीतर टिकणार नाही पैसा
Recommended image2
Diwali Snack Platter : यंदाच्या दिवाळीत फराळाच्या ताटात ठेवा हे ५ स्पेशल पदार्थ
Recommended image3
Daily Horoscope : आज या राशींच्या व्यक्तींसाठी खास दिवस! पाहा तुमचं राशीभविष्य काय सांगतंय
Recommended image4
Diwali Pooja Time : दिवाळी 2026; पूजा वेळ, शुभ मुहूर्त, अभ्यंगस्नान... जाणून घ्या संपूर्ण माहिती
Recommended image5
Health Tips : हवामान बदलतंय? सर्दी-खोकल्याने हैराण आहात? हे सोपे उपाय नक्की करा
Related Stories
Recommended image1
Homemade Ghee Recipe : दुधाच्या सायीपासून घरीच बनवा साजूक तूप, सोपी पद्धत
Recommended image2
7 Cup Burfi Recipe : तोंडात टाकताच विरघळेल, फक्त ७ साहित्यांत घरच्या घरी बनवा ही खास मिठाई
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved