Chicken French Fries Recipe : विकेंड पार्टीला घरच्याघरी तयार करा मसालेदार पेरी पेरी चिकन फ्रेंच फ्राइज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

| Published : Jun 15 2024, 11:25 AM IST / Updated: Jun 15 2024, 11:28 AM IST

Chicken French Fries Recipe
Chicken French Fries Recipe : विकेंड पार्टीला घरच्याघरी तयार करा मसालेदार पेरी पेरी चिकन फ्रेंच फ्राइज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

विकेंड पार्टीसाठी घरी मित्रमंडळी येणार असल्यास त्यावेळी चटपटीत अशी रेसिपी कोणती तयार करायची असा प्रश्न पडलाय का? तर विकेंड पार्टीसाठी तुम्ही घरच्याघरीच मसालेदार चिकन फ्रेंच फ्राइजची रेसिपी तयार करू शकता.

Chicken French Fries Recipe in Marathi : फ्रेंच फ्राइज रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांना आवडते. खरंतर, झटपट होणारी रेसिपी असण्यासह टेस्टीही असते. अशातच विकेंड पार्टीला घरी मित्रमंडळी येणार असल्यास तुम्ही चटपटीत असे मसालेदार चिकन फ्रेंच फ्राइजची रेसिपी तयार करू शकता. जाणून घ्या संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर...

साहित्य

  • 300 ग्रॅम बोनलेस चिकन
  • एक टिस्पूच काळी मिरी पावडर
  • एक टिस्पून लसूण पावडर
  • एक टिस्पून जीरे पावडर
  • एक टिस्पून दालचिनी पावडर
  • एक टिस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर
  • एक टिस्पून हळद
  • एक टिस्पून धणे पावडर
  • आवश्यकतेनुसार मीठ
  • तळण्यासाठी दोन वाटी तेल

कृती

  • सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घेत त्याचे पातळ उभे बारीक तुकडे करा.
  • गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये चिकनचे तुकडे शिजण्यासाठी ठेवा. असे केल्याने चिकनला येणारा वास दूर होईल.
  • चिकनचे तुकडे अर्धे कच्चे शिजवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढा.
  • गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करत चिकनला गोल्डन रंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या.
  • चिकन तळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा.
  • एका बाउलमध्ये काळी मिरी पावडर, लसूण पावडर, जीरे पावडर, दालचिनी पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर व्यवस्थितीत एकत्र मिक्स करा. यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घाला. अशाप्रकारे तुमचा पेरी पेरी मसाला तयार होईल.
  • पेरी मसाला एका बाउलमध्ये काढून घेत त्यामध्ये तळलेले चिकनचे तुकडे व्यवस्थितीत मिक्स करा. जेणेकरुन चिकला पेरी पेरी मसाला व्यवस्थितीत लागला जाईल.
  • एका प्लेटमध्ये विकेंड पार्टीसाठी मसालेदार पेरी पेरी चिकन फ्रेंच फ्राइजची रेसिपी तयार होईल. यासोबत टोमॅटो कॅचअप अथवा मोयोनिज खाऊ शकता.

आणखी वाचा : 

जिलेबी तळण्याची ही पद्धत पाहून व्हाल अव्वाक, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

Achari Chicken Tikka : वीकेंड पार्टीवेळी नॉन-व्हेजमध्ये अचारी चिकन टिक्का आहे बेस्ट पर्याय, जाणून घ्या रेसिपी