सार

महिंद्र ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यावसायिक आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये पाकिस्तानमधील एक व्यक्ती जिलेबी तळत असल्याचे दिसून येत आहे.

Viral Video : बदलत्या तंत्रज्ञानामुळे जग आज वेगाने प्रगती करत आहे. कणीक मळणे ते भांडी धुण्याच्या मशीन सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 3D प्रिंटरच्या नोज मशीनच्या माध्यमातून जिलेबी तयार करताना दिसून येत आहे. या व्हिडीओला आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंट शेअर केले आहे.

आनंद महिद्रांनी शेअर केला व्हिडीओ
आनंद महिद्रांनी शेअर केलेल्या 40 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानमधील एक फूड वेंडर जिलेबी तळताना दिसून येत आहे. पण जिलेबी तळण्याची अनोखी पद्धत पाहून आनंद महिंद्रा देखील हैराण झाले आहे. या व्यक्तीने जिलेबी तळण्यासाठी 3D प्रिंटरच्या नोज मशीनचा वापर केल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. याशिवाय जिलेबी खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर लांबलचक रांग लागल्याचेही दिसून येत आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ पाकिस्तानातील फैसलाबाद येथील असून पिप्पल बाटा असे दुकानदाराचे नाव आहे.

आनंद महिंद्रांनी दिली अशी प्रतिक्रिया
व्हिडीओवर आनंद महिंद्रांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “3D प्रिंटर नोजलचा वापर करून जिलेबी तळण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे संमिश्र भावना मनात निर्माण झाल्या आहेत. जिलेबी तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. पण मी विचार करत असलेली पद्धत फार जुनी आहे.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला आतापर्यंत 7 लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. एका युजर्सने लिहिले की, "मॉर्डन प्रॉब्लमेवर मॉर्डन सोल्यूशन", दुसऱ्याने म्हटले की, "सर्वकाही ठीक आहे पण हाताने जिलेबी तयार करणे बेस्ट पर्याय आहे." तिसऱ्याने म्हटले की, "टेक्नॉलॉजीमुळे जग बदलत आहे."

आणखी वाचा : 

Deepfake च्या प्रकरणांना आळा बसण्यासाठी मेटाचा नवा प्लॅन, युजर्सला रिपोर्ट करणे होणार सोपे

मुंबई विमानतळावर व्हील चेअर न मिळाल्याने दीड किलोमीटर पायी चालत गेलेल्या वृद्धाचा मृत्यू

कर्नाटकातील मंदिरांकडून वसूल केला जाणार 10 टक्के टॅक्स, काँग्रेस सरकारच्या निर्णयानंतर BJP ने दिली संतप्त प्रतिक्रिया