पाच रुपयांच्या लिंबूवर लावली 35 हजारांची बोली, कारण ऐकून व्हाल हैराण
सर्वसामान्यपणे एका लिंबूची किंमत पाच ते दहा रुपये असू शकते. पण तमिळनाडूतील एका गावात एक लिंबूवर 35 हजारांची बोली लावण्यात आली.
35 हजार रुपयांच्या लिंबूचा लिलाव तमिळनाडूतील इरोड पासून दूर असलेल्या शिवगिरी गावात करण्यात आला. या गावातील प्राचीन शंकरांच्या मंदिरात लिंबू अर्पण करण्यात आला होता.
महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराला काही गोष्टी अर्पण करण्यात आल्या होत्या. या गोष्टींचा नंतर लिलाव करण्यात आला. लिलावादरम्यान, लिंबू 35 हजार रुपयांना खरेदी करण्यात आला.
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रत्येक महाशिवरात्रीनिमित्त शंकराला अर्पण केल्या जाणाऱ्या गोष्टींचा लिलाव केला जातो. खरंतर, लिलावामधील गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते.
परंपरेनुसार, लिलाव करण्यात आलेला लिंबू महाशिवरात्रीनिमित्तच्या पूजेदरम्यान शंकराच्या समोर ठेवण्यात आला आहे. पुजारीने एक पूजा केल्यानंतर लिंबूचा लिलाव केला.
अशी मान्यता आहे की, लिलावात जो व्यक्ती लिंबूवर सर्वाधिक बोली लावतो त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होण्यास काही शुभ फळ आयुष्यात मिळतात.