जागतिक कर्करोग दिन, दर वर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
क्लोज द केअरगॅप अशी या वर्षीची कर्करोग दिनाची थीम आहे.
जगातील प्रत्येकाला लवकर निदान, योग्य आणि वेळेवर उपचार मिळावे यासाठी केअर गॅप कमी होणे आवश्यक आहे. सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या.
हा जीवघेणा आजार भारतातील महिलांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हा कॅन्सर स्तनाच्या पेशींमध्ये उद्भवतो आणि पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, विशिष्ट प्रकारच्या ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) चा दीर्घकाळासाठी संसर्ग हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे.
तोंडाचा कर्करोग किंवा ओरल कॅव्हिटी कॅन्सर हे कर्करोगजन्य रोग आहेत जे तोंडाच्या कोणत्याही भागात आढळू शकतात. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे या कॅन्सरचे प्रमुख कारण आहे.
जठराचा कर्करोग, ज्याला पोटाचा कर्करोग देखील म्हणतात, हा भारतातील चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. वेळीच लक्षात न आल्यास हा कर्करोग जीवघेणा ठरतो.
भारतात फुफ्फुसाचा कर्करोग हा पाचव्या क्रमांकाचा कर्करोग आहे. धुम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.