सार

दिल्लीतील एम्स रुग्णालय आता ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांसाठी भारतातील संगीताच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करणार आहेत. खरंतर, ही म्युझिक थेरपी काय आहे याबद्दल एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉ. दीप्ति विभा यांनी अधिक माहिती दिली आहे.

Music Therapy for Brain Stroke  Patients :  एम्स दिल्ली रुग्णालय (Delhi AIIMS Hospital) आणि आयआयटी दिल्ली (IIT Delhi) एकत्रित मिळून एका नावीन्यपूर्ण गोष्टीवर काम करत आहे. ज्यामध्ये संगीताच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. एम्स दिल्ली आता ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांवर भारतातील संगीताच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करणार आहे. जाणून घेऊया म्युझिक थेरपी नक्की काय आहे आणि ब्रेन स्ट्रोकच्य रुग्णांसाठी किती महत्त्वाची ठरेल याबद्दल सविस्तर......

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये एम्स रुग्णालयाच्या डॉक्टर दीप्ति विभा यांनी म्हटले की, ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णामध्ये बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता कमी होते. अशातच रुग्णांना भारतीय संगीताच्या माध्यमातून बोलणे आणि गाणी गुणगुण्यास शिकवले जाणार आहे. भारतात पहिल्यांदाच ॲफेसिया (Aphasia) विकाराचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जाणार आहे. यासाठी एम्स रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभाग आयआयटी दिल्लीची मदत घेत आहे.

ॲफेसिया विकार नक्की काय आहे?
ब्रेन स्ट्रोकच्या स्थितीनंतर जवळजवळ 21-38 टक्के रुग्णांना ॲफेसिया विकार होतो. यामध्ये रुग्णाच्या मेंदूचा डावा हिस्सा काम करणे बंद करतो. खरंतर व्यक्तीच्या डाव्या मेंदूच्या हिस्स्यामुळे व्यक्ती बोलतो आणि गोष्टी समजून घेण्यासह आपल्या भावना दुसऱ्यांसमोर व्यक्त करू शकतो. पण ॲफेसियाचा रुग्ण एक लहान शब्द देखील बोलू शकत नाही. याच समस्येवर मात करण्यासाठी एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाकडून म्युझिक थेरपीवर काम केले जात आहे. परदेशात ॲफेसिया रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो.

कशाप्रकारे काम करते म्युझिक थेरपी?
डॉ. विभा सांगतात की, ॲफेसिया विकाराचा सामना करत असलेल्या रुग्णाच्या मेंदूचा डावा हिस्सा काहीच काम करत नाही. पण उजवा हिस्सा पूर्णपणे हेल्दी असतो. यामुळे रुग्णाला एखादे गाणे समजण्यासह ते बोलू देखील शकतो. दरम्यान, ॲफेसियाचा रुग्ण एक शब्द बोलू शकत नसला तरीही म्युझिक थेरपीच्या माध्यमातून तो संपूर्ण गाण बोलू शकतो.

म्युझिक थेरपीच्या माध्यमातून रुग्णाच्या मेंदूचा उजवा हिस्सा अ‍ॅक्टिव्ह करुन त्याला एखादे गाणे बोलणे, गुणगुण्यास शिकवले जाते. यामध्ये सुरुवातीला गाण्यातील लहान कडवी ऐकवली जातात. यामुळे रुग्णाला कळते की, तो संगीत ऐकण्यासह बोलू देखील शकतो. संगीत कोणते असणार हे आधीपासूनच ठरविले जाते. जसे की, 'रघुपति राघव राजा राम' किंवा 'ए मेरे वतन के लोगो' अशा गाण्यांचा वापर म्युझिक थेरपीवेळी केला जातो.

ॲफेसिया रुग्णांवर अधिक केला जातोय रिसर्च
सध्या आयआयटी दिल्ली आणि एम्स दिल्ली रुग्णाल मिळून ॲफेसिया विकाराचा सामना करत असलेल्या रुग्णांवर अधिक रिसर्च करत आहेत. प्रोफेसर दिप्ती यांनी म्हटले की, "एक डॉक्टर कर्नाटकातील संगीतातील जाणकर देखील आहेत. जे संगीतामधील बारकावे उत्तमपणे जाणतात. त्यांच्यासोबत मिळून काही गाणी शोधली जात असून त्याचा नंतर वापर म्युझिक थेरपीमध्ये केला जाऊ शकतो."

आणखी वाचा : 

पाढे पाठ करण्याची ही आगळीवेगळी सोपी पद्धत होतेय व्हायरल, Watch Video

दिवसभरातून आपण नेमके किती पाणी प्यायला हवे, जाणून घ्या