सार

बीटाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण बीटाच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करतो. पण तुम्ही घरच्याघरी बीटाचे लोणचं तयार करू शकता. जाणून घेऊया बीटाच्या लोणच्याची रेसिपी सविस्तर...

Beetroot Pickle Recipe : पराठे असो किंवा वरण-भाताचे जेवण, यावेळी लोणचं आवडीने खाल्ले जाते. लोणच्याचे वेगवेगळे प्रकार येतात. पण तुम्ही कधी घरी बीटाचे लोणचं तयार केले आहे का? जाणून घेऊया बीटाचे लोणचं तयार करण्यासाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर...

सामग्री

  • दोन बीट
  • दोन चमचे राईचे तेल
  • एक चमचा राईच्या बिया
  • दीड चमचा मेथी दाणे
  • दीड चमचा बडीशेप
  • दीड चमचा कलोंजी बिया
  • दीड चमचा हळद पावडर
  • दीड चमचा लाल मिरची पावडर
  • साखर
  • एक चतुर्थांश कप व्हिनेगर

कृती

  • सर्वप्रथम बीटाची साल काढून बारीक किसून घ्या. अथवा तुम्ही लहान आकारातही बीट कापू शकता.
  • एका पॅनमध्ये राईचे तेल गरम करा. तेल थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये राईच्या बिया, मेथी दाणे, बडीशेप आणि कलोंजीच्या बिया टाका.
  • लोणच्यासाठी तयार करण्यात आलेल्या तडक्यामध्ये हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाका. आता सर्व गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करून त्यामध्ये बीट टाका.
  • गॅस मध्यम आचेवर ठेवून बीट चार ते पाच मिनिटे शिजवून घ्या. यामध्ये मीठ आणि साखर टाकून सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
  • लोणच्याला आंबट चव येण्यासाठी व्हिनेगर मिक्स करण्यास विसरू नका. व्हिनेगरमुळे तुमचे लोणचं खूप दिवस टिकून राहण्यासही मदत होईल.
  • लोणच्याची सर्व सामग्री व्यवस्थितीत भाजून झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी थोडावेळ ठेवा. याशिवाय लोणचं बरणीमध्ये भरण्याआधी एक-दोन दिवस उन्हातही ठेवा. यानंतरच बरणीमध्ये तुम्ही तयार केलेले बीटाचे लोणचं बरणीत भरून ठेवा.

आणखी वाचा : 

रेस्टॉरंटसाठी घरच्याघरी तयार करा Bubble Tea, वाचा संपूर्ण रेसिपी सविस्तर

Wheat Momos Recipe : मुलांना मोमोज खायला आवडतात? घरच्याघरी बनवा गव्हाच्या पीठाची ही पौष्टिक रेसिपी

Orange Chicken Recipe : आंबट-तिखट चव असणाऱ्या ऑरेंज चिकनची रेसिपी, वाचा स्टेप बाय स्टेप